Homeटॉप स्टोरीप्रशिक्षण आयआयटीचे, चुना...

प्रशिक्षण आयआयटीचे, चुना लावला १४ कोटींचा!

गोपनीय रित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग –आठ(VIII)च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या राव आयआयटी एकेडमी नावाचे क्लासेस चालवणाऱ्या कंपनीकडून विद्यार्थ्यांकडून जीएसटीच्या नावावर उकळण्यात आलेल्या १४ कोटी रूपयांचा गैरवापर केल्याचे या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे.

मेसर्स राव एज्युसोल्युशन्स प्रा. लि. ही एक खासगी कंपनी राव आयआयटी अकादमी, या ब्रँड नावाखाली प्रशिक्षण देण्याचे काम करते. या कंपनीने त्यांच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कावर १८% जीएसटी कर (GST) वसूल केल्याचा संशय आहे. परंतु विभागाकडे दाखल केलेल्या आयकर प्रमाणपत्रात (रिटर्न्समध्ये) या सेवा असंबंधित आणि सवलत सेवा म्हणून घोषित केल्या आहेत. अशाप्रकारे गोळा केलेले शिक्षण शुल्काचा कंपनीकडून गैरवापर केल्याचे मानले जाते.

याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांपैकी एकाला सीजीएसटी (CGST) कायदा, २०१७च्या कलम ६९ अंतर्गत कलम १३२ (१) (डी)च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. संशयितांवर १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली सीजीएसटी, (CGST) कायद्याच्या कलम १३२ (१) (आय) अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केलेअसता अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सीजीएसटी मुंबई विभागाच्या जीएसटी कर फसवणुकीच्या नवीन पद्धतींचा त्वरीतशोध घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग  असून यामुळे कर चोरी करणाऱ्यांवर आळा बसेल, असे बोलले जाते.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content