Thursday, December 12, 2024
Homeचिट चॅटयातले किती सदस्य...

यातले किती सदस्य पुढच्या जन्मी होणार फ्लेमिंगो?

पुढच्या जन्मी विधानसभेतील किती सदस्य फ्लेमिंगो पक्ष्याचा जन्म घेणार आहेत, हे मंत्रिमहोदयांनी सांगावे, अशी अजब मागणी आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. याचे उत्तर देण्यासाठी मला चित्रगुप्ताच्या संगणकाला एक्सेस लागेल, असे सांगून ही माहिती पटलावर ठेवता येणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले तेव्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.  

फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृत्यूच्या प्रश्नावरून आशिष शेलार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हास्यकल्लोळ उडवून दिला. फ्लेमिंगो पक्ष्यांच्या मृत्यूबद्दल सांगताना मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक जिवाला ८४ लाख जन्म घ्यावे लागतात. त्यामुळे आपल्या विधानसभेतील कोणाही आमदाराला या

फ्लेमिंगो

फ्लेमिंगोंसारखे पुढच्या जन्मी फ्लेमिंगो होऊन असे मरण यायला नको, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यावर आशिष शेलार यांनी उपप्रश्न विचारला की, मंत्रिमहोदयांनी फ्लेमिंगो पक्ष्यांचा प्रश्न अध्यात्मिक पातळीवर नेला आहे. त्यामुळे सभागृहातील किती सदस्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे हे मला माहीत नाही. पण पुढच्या जन्मी किती आमदार फ्लेमिंगो म्हणून जन्माला येतील, याची माहिती वनमंत्री देऊ शकतील का…

शेलार यांच्या प्रश्नावर सभागृहात हंशा उसळला. मुनगंटीवार यांनी पटकन उभे राहून उत्तर दिले की, पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळणार, हे सांगायला मला चित्रगुप्ताच्या संगणकाला एक्सेस लागेल. तो मिळू शकणार नसल्याने ही माहिती मी पटलावर ठेवू शकणार नाही.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करून निर्देश दिले की, जी माहिती पटलावर ठेवता येणार नाही, त्यावर चर्चाही करू नका… त्यामुळे सभागृहात पुन्हा हंशा उसळला.

Continue reading

रोहित पाटलांनी सार्थ केले आरआर आबांचे नाव..

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील तथा आरआर आबा आपल्या प्रभावी वक्तृत्त्वशैलीसाठी प्रसिद्ध होते. राज्याच्या विधानसभेत आर आर पाटील यांनी अनेकदा आपल्या प्रभावी भाषणांमधून सभागृहाची दाद मिळवली होती. नुकतीच पंचविशी गाठलेल्या त्यांच्या चिरंजीवांनी सोमवारी विधानसभेतील पहिले भाषण करताना थेट...

मराठा आरक्षणाला काँग्रेसचाच विरोध!

आमच्या सरकारने सत्तेवर येताच दिलेले दहा टक्के मराठा आरक्षण रद्द व्हावे, यासाठी न्यायालयात गेलेली व्यक्ती कॉँग्रेसवालीच आहे, असे सांगून मराठा आरक्षणाला कॉँग्रेसवालेच विरोध करताहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर...

महायुतीचा कोथळा वाचवण्यासाठी महाराष्ट्रात वाघनखांचा उत्सव

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफझलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला आणि या इतिहासापासून प्रेरणा घेत राज्यातील महायुती सरकार आता येणाऱ्या निवडणुकीत स्वतःचा कोथळा वाचवण्यासाठी वाघनखांचा उत्सव महाराष्ट्रातल्या चार प्रमुख शहरांमध्ये भरवणार आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा कोथळा काढला गेला हा...
Skip to content