Homeकल्चर +‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’...

‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ प्रकाशित!

समाज एकसंघ ठेवण्यासाठीचा संदेश असलेले ‘हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम’ हे पुस्तक नवीन पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव विनित अग्रवाल यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी गृह विभागचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेखक तथा प्रधान सचिव विनित अग्रवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

या पुस्तकाद्वारे वाचकांना नवी दिशा मिळेल. पुस्तकाचे लेखक अग्रवाल हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी अतिशय विचारपूर्वक व मेहनतीने हे पुस्तक लिहिले आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात आपण काम करीत असलो तरी मनात लपलेला लेखक वेळात वेळ काढून लिहितोच त्यातूनच अग्रवाल यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

प्रास्तविकात विनित अग्रवाल म्हणाले की, समाजात वावरत असताना पडलेले विविध प्रश्न, त्याचे उत्तर शोधण्यामागची धावपळ, ही यामागील प्रेरणा आहे. 251 पाने असलेल्या पुस्तकात 30 वेगवेगळे पाठ (चॅप्टर) असून विविध उपनिषदे यात ईशउपनिषद, सांख्ययोग यावरील भाष्यही आहे, तसेच प्रश्नोत्तरेदेखील आहेत.

लेखकाविषयी थोडेसे..

राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव असलेले विनित अग्रवाल हे आय आय टी (दिल्ली)मधून अभियांत्रिकी पदवीधर आहेत. त्यांनी मॅनेजमेंटमध्ये उच्च पदवी मिळविली आहे. काही काळ कार्पोरेट क्षेत्रात काम केले. त्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. सी.बी.आय. तसेच राज्य शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. पोलीस दलातील मानाचे व प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना मिळाले आहे.

विनित अग्रवाल हे मान्यवर लेखक आहेत. विश्लेशणात्मक शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना तेथील अनुभवावर त्यांनी “रोमांस ऑफ अ नक्शलाईट” हे पहिले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे स्वागत माध्यम तसेच जनेतेने केले. तद्नंतर त्यांनी महाभारतावर आधारीतर “ऑन दि ईव्ह ऑफ कलयुग” हे काव्यनाटय असलेले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकासही उत्तम प्रतिसाद लाभला आणि आता त्यांचे हिंदूइझम बियॉन्ड रिच्युअलीझम हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content