Details
“Guys, it’s time…”
01-Jul-2019
”
विंग कमांडर देवेंद्र औताडे
Indian Air Force
२६/११. बघताबघता १० वर्षे पूर्ण झाली. आठवणी जितक्या ताज्या असतात, एक दशक तितकंच भर्रकन निघून गेल्यासारखं वाटतं.
गोष्ट नोव्हेंबर २००८ ची आहे. त्यावेळेस पंजाबमधल्या भटिंडा येथे लढाऊ वैमानिक म्हणून माझी पोस्टिंग होती. आता भटिंडा म्हटलं की लोकांना ‘jab we met’ या पिक्चरची हमखास आठवण येणार. भटिंडा आहे ही तसंच हिरवीगार शेती, सर्सो के फूल वगैरे वगैरे.. पण बॉर्डरपासून अतिशय जवळ असल्यामुळे आमचा बेस नेहमीच कमालीचा active असायचा. We were always on our toes, alert. Day flying, night flying, security briefings चं सत्र चालूच असायचं.
नोव्हेंबरच्या अखेरीस मी जरा जास्तच उत्साहात होतो. त्याला कारणही तसंच होते. वर्षभर साठवून ठेवलेली सुट्टी घेऊन आम्ही महिनाभरासाठी घरी जाणार होतो. २६ तारखेला दिवसभराचं flying करून नुकताच घरी आलो होतो. ‘स्वेटर, जॅकेट ज्यादा मत लेना, वहाँ इतनी ठंड नही होतीI’ चहा घेत घेत बायकोला bag packing च्या सूचना द्यायचं माझं काम चालू होतं, तेवढ्यात माझा फ़ोन वाजला. ‘सर, सबको स्क्वाड्रन बुलाया है।, immediately’… ऑफिसमधून Operations Clerk चा फ़ोन होता. ‘अभी इतनी रात को? ऐसा क्या हो गया?’ नक्कीच सेक्युरिटी ब्रिफिंग असेल किंवा उद्या कुठल्यातरी सीनियर ऑफिसरची इंस्पेक्शन व्हिजीट तर नाही? नाना तऱ्हेच्या संकल्पना मनात आल्या. ‘पता नही सर, लेकिन शायद CO सर भी आ रहे हैं, जय हिंद सरl’ एव्हढं बोलून त्याने फोन ठेवून दिला. आता Commanding Officer स्वतः येणार म्हणजे प्रकरण थोडं सीरीयस आहे हे मी समजलो. लगेच अरूणला फोन लावला. अरूण हा स्क्वाड्रनमध्ये मला दोन वर्षे जुनियर. पण माझा जवळचा मित्र. अगदी दिलखुलास, फिकर नॉट माणूस. ‘ओए क्या हुआ भाई क्यूँ बुलाया हैं?’ माझा अरूणला प्रश्न. ‘पता नही ऑटी भाई, होगी कुछ ब्रिफिंग शिफिंग.. हमें क्या. वैसे भी पिछले कुछ दिनोंसे दारू पिके कोई दंगा तो मैंने किया नहीं, तो डरने की कोई बात नही. जो भी हो, देखा जाएगा। और सुन, साथ में badminton रॅकेट लेकर आना, ब्रिफिंग के बाद १-१ गेम खेलेंगे।’ ईथे दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे Air Force मध्ये मी औताडेचा ऑटी झालोय आणि दुसरं म्हणजे अरूणच्या badminton रॅकेटचा नंतर बरेच दिवस उपयोग झाला नाही. ती गोष्ट वेगळी. असो!
‘स्क्वाड्रन जाके आता हूँ, सबको बुलाया हैं।’ बायकोच्या प्रश्नांना डावलून मी स्क्वाड्रनला पोहोचलो. पार्किंगमधील गाड्यांवरून लक्षात आले की बरेच जण ऑलरेडी पोहोचलेले आहेत. आता ब्रिफ़िंगनंतर या सर्वांनी badminton खेळायचं ठरवलं तर काय होईल, या विचाराने क्षणभर मला टेंशनच आलं. बाहेरील Tarmac (जिथे विमान पार्क होते) वरील दृश्य पाहून तर मी दचकलोच. संपूर्ण स्टाफ आलेला होता. Tarmac वरील सर्व लाईटस ऑन होते. स्पीकरवर अनाऊसमेंट चालू होत्या. टेक्निशियन्स इकडेतिकडे पळत होते. काही जण push करून विमान बाहेर काढत होते. आज काय अचानक नाइट फ्लाइंग आहे की काय? मला प्रश्न पडला. आत स्क्वाड्रनमध्ये पोहोचलो तर तेच टेंशनचं वातावरण. वरून कुणी काही बोलण्यासही तयार नाही. ‘नक्की काय बिनसलं?’ माझी घालमेल सुरू झाली. सर्व पायलट्सना एकच इंस्ट्रक्शन होते- wait Inside briefing room till further orders. कुठल्याही मिशनवर जाण्याआधी ब्रिफिंग रूममध्ये मिशनबद्दल detailed briefing होते. मिशनचं aim काय आहे, कसे पार पाडायचे, शत्रूबद्दल असलेली सर्व महिती, मिशनमधील धोक्याची काय लेव्हल आहे, कुठल्या क्षणी परत फिरायचं (किंवा फिरायचंच नाही!) इत्यादी सर्व बारकाव्यांवर ब्रिफिंग रूममध्ये बारकाईनं चर्चा होते. ब्रिफिंग रूममध्ये शिरताच माझी गाठ अरूणशी झाली. त्याची badminton रॅकेट मात्र कुठे दिसत नव्हती. ‘पता नहीं क्या हो रहा है यार, लेकिन यहाँ मामला इतना सीरियस है, की सबसे पहले मैं अपनी badminton रॅकेट छुपा के आ गया!’ मला बघताक्षणी तो पठ्ठ्या सत्य उगळून बसला. इटक्यात प्रशांत ‘पॉट्स’ सर भेटले. ‘सरजी, क्या हो गया हैं कुछ पता है क्या? कहीं ऐसा तो नहीं की रातोरात लाहोर चलना है?’
भेदरलेल्या अरूणने मिश्किलपणाचे सोंग आणत पॉट्स सराना प्रश्न टाकला. जन्माच्या वेळी चेहऱ्याचे हावभाव देवाकडेच विसरलेल्या पॉट्सने अरूणकडे एक expression-less नजर टाकली आणि शांतपणे टोमणा मारला- ‘यह तुम बॅचलर और newly married लोगों का यही प्रोब्लेम है। Reality show या सिरीयल देखते रहते हो. ज़रा TV ऑन करो और न्यूज देखो’. माझ्या लग्नाला वर्षभरही झालं नव्हतं हे पॉट्स सरांच्या चांगलंच लक्षात होतं. आम्ही घाईघाईने बाजूच्या रूममधला TV चालू केला. न्यूज चॅनल लावलं आणि TV वरचं दृश्य पाहून स्तब्धच झालो. Terrorist Attack? तेही मुंबईत? ताज हॉटेलवर? पण कुणी? आणि का? कसे? डोकं सुन्न झालं होतं. Reporter वारंवार पाकिस्तान, ISI, लष्कर अशी नावं घेत गेला आणि डोक्यातलं कोडं उलगडत गेलं.
शेवटी आम्ही सर्व पायलट्स ब्रिफिंग रूममध्ये जमलो. आम्ही १०-१२ जण होतो. रूममध्ये pin-drop सायलेंस होता. टेंशन जाणवत होतं. सर्वजण Commanding Officer (CO) ची वाट पाहात होते, जे स्वतः भटिंडा Base Commander कडे परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी गेले होते. शेवटी रात्री ११ वाजता CO ची एंट्री झाली. स्टेजवर जाऊन एका प्रदीर्घ श्वासानंतर त्यांनी बोलण्यास सुरूवात केली. त्यांचे पहिले शब्द होते-
‘Guys….it’s time..
I hope everyone has seen the news by now, and aware as to what is the situation in the country.’
त्यांच्या प्रत्येक इंग्लिश शब्दाबरोबर उर भरून येत होता. ‘ऑफिसर्स, आपल्या देशावर समुद्रामार्गे हल्ला झाला आहे आणि आता प्रत्युत्तरासाठी आपणास तयार रहायचं आहे. ही घटका सर्वांनी लक्षात ठेवा. Live action ची वाट बघतबघत लोकं रिटायर होतात. आपण भाग्यशाली आहोत. आपल्याला action बघायला मिळणार आहे. ज्यासाठी आपण आयुष्यभर तयारी केली, ती घटका येवून ठेपलीय. Remember, not all warriors are lucky, because only a few get to fight a war, and we are going to be the lucky ones.’
CO च्या शब्दांनी सर्व सुन्न झाले होते. लढ़ाईच्या आधी सेनापती सर्व सैनिकांना उत्स्फूर्त, उत्साहवर्धक भाषण देतो, जेणेकरून सर्वांचा जोश वाढतो हे पिक्चरमध्ये बऱ्याचदा पाहिलं होतं. पण आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. फॅमिली, चैनीच्या वस्तू, जीवन इत्यादी गोष्टी एका क्षणात तोकड्या वाटू लागल्या होत्या. आपण काय आहोत, क्षत्रिय धर्म काय आहे, कोट्यवधी लोकांची आपल्यावर काय जबाबदारी आहे, त्याची एकदम जाणीव झाली.
CO पुढ़े म्हणले- ‘या क्षणापासून आपण हाय अलर्टवर आहोत. कुठल्याही क्षणी हल्ला होईल किंवा करावा लागेल. बाहेर दोन लढाऊ विमानं प्रतिहल्ल्यासाठी सुसज्ज आहेत. २४ तास दोन्ही विमानांबरोबर पायलट्स तयार लागतील. उद्यापासून ड्यूटी वाटून घेऊ. पण आज रात्रीसाठी दोन पायलट्स हवेत. त्यांनी विमानाच्या तिथेच रात्रभर राहावं. काहीही होऊ शकते. एक पायलट मी आहे, मला आणखी एकाची गरज आहे, कोण तयार आहे?’
माझा विश्वासच बसेना. अरे आमचा Boss तो. त्याने म्हणावे आगीत उडी मारा आणि आम्ही मारायची, NO QUESTIONS ASKED! मग त्याला ही रिस्क घ्यायची काय गरज? तो ऑर्डरही देऊ शकला असता, कुणा दोन जणांना. But he was a true leader, who always led from the front. मग काय? CO ने विचारल्या विचारल्या माझा हात ताडकन वर गेला. CO च्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं.
‘ऑटी, प्रेरणा को बोल देना रात में डर लगे तो मेरे घर चली जाए, मैं मेरी वाईफ को बोल देता हूँ, उसे पिक कर लेंगी. और हाँ, कल सुबह की चाय चारों साथ में पिएंगे’. या एका रात्रीत काय होणार ते माहीत नव्हतं आणि आमचे CO साहेब सरळ दुसऱ्या दिवशीच्या चहाची गोष्ट करत होते. पण CO च्या निडर वृत्तीने एकदम confidence आला. कडाक्याच्या थंडीत विमानाबरोबर घालवलेली ती रात्र कालांतराने मी कदाचित विसरेनही पण निडर नेतृत्त्व काय असतं ती शिकवण कधीच विसरणार नाही. आणि आणखी एक गोष्ट मी नक्कीच शिकलो. Action मध्ये जायच्या वेळेस मी माझ्या ज्युनियर्सना एकच वाक्य बोलेन…
Guys, it’s time…”
“विंग कमांडर देवेंद्र औताडे