Homeटॉप स्टोरीमराठी भाषा गौरव...

मराठी भाषा गौरव दिनीच राज्यपालांचे हिंदीत भाषण!

मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी हिंदीमध्ये भाषण केले. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

राज्यपालांच्या भाषणाला कॅबिनेटमध्ये परवानगी दिली जाते याचा अर्थ ही परवानगी हिंदी भाषेला दिली गेली. आज मराठी भाषा दिन आहे. त्याचदिवशी हिंदीत अभिभाषण व्हावे हे दुर्दैवी आहे असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला मराठी भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवरून आमदार अहिरे नाराज

विधानभवनातील हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. मी कधीही अधिवेशन बुडविले नाही. पण जर अशी सुविधा असेल तर मी इथून निघून जाईन, अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.

बाळ आजारी असल्याने आपण त्यांनी तशी कल्पनाही दिली होती. त्यानंतर त्या आपल्या तान्ह्या बाळासह विधान भवनातील नव्या हिरकणी कक्षात दाखल झाल्या. पण हिरकणी कक्षात स्वच्छतागृहाची सुविधाच नव्हती. सगळीकडे धूळ असल्याने आपल्या आजारी बाळाला ठेवायचे कुठे, असा प्रश्न त्यांना पडला. या हिरकणी कक्षाचा काही उपयोग नाही. माझ्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी इथे आलेले असताना मलाच सुविधा उपलब्ध होत नसेल तर जनतेला न्याय तरी कसा मिळेल, अशा भावना नंतर त्यांनी व्यक्त केल्या.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content