Friday, September 20, 2024
Homeहेल्थ इज वेल्थरेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात...

रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यात तातडीने रोखली!

केंद्र सरकारने वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता कोरोनावरील उपचारांत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन व रेमडेसिविर इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक घटकांच्या (API) निर्यातीवर, कोविडसंबधित परिस्थितीत सुधार होईपर्यंत बंदी घातली आहे.

भारतात सध्या कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. आज, म्हणजेच, 11 एप्रिल 2021 रोजी देशात 11.08 लाख कोविड रुग्णसंख्या असून, त्यात हळूहळू वाढ होत आहे. यामुळे कोविड रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये या मागणीत अजून वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या इंजेक्शनच्या निर्यातीवर सरकारने तातडीने बंदी घातली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अमेरिकेच्या मेसर्स  गिलीड सायन्सेसकडून ऐच्छिक परवाना करारान्वये सात भारतीय कंपन्या रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती करत आहेत. त्यांची क्षमता प्रतिमहिना 38.80 लाख इतकी आहे.

याशिवाय रुग्ण व रुग्णालयांना रेमडेसिविर सहजपणे उपलब्ध होण्यासाठी केंद्राने इतर अनेक पावले उचलली आहेत.

  1. औषधाची उपलब्धता गरजूंना सहजपणे कळावी, म्हणून देशातील रेमडेसिविरच्या सर्व उत्पादकांनी त्यांच्या संकेतस्थळावर त्याच्याकडील साठा व वितरक यांची माहिती द्यावी असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.
  2. औषध तपासनीस (ड्रग इन्स्पेक्टर) व इतर अधिकाऱ्यांना औषधाच्या साठ्याची तपासणी करून त्यासंबधीचे गैरप्रकार रोखण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्याचप्रमाणे त्याचा साठा व काळ्या बाजारावर अंकुश ठेवण्यासाठी परिणामकारक कारवाईचे अधिकार दिले आहेत. संबधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे  आरोग्य सचिव याबाबतीत औषध तपासनीसांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.
  3. रेमडेसिविरच्या उत्पादनवाढीला चालना देण्याच्या दृष्टीने औषध विभाग देशातील उत्पादकांच्या संपर्कात आहे.

अनेक अनुभवी तज्ज्ञ आणि तज्ज्ञ समितींच्या सहयोगातून, तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे तयार करण्यात आलेली ‘कोविड-19 राष्ट्रीय औषधोपचार नियमावली’ ही कोविड रुग्णांवरील उपचारासाठी मार्गदर्शक असल्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

या नियमावलीनुसार रेमडेसिविर ही इन्वेस्टिगेशनल उपचारपद्धती म्हणजे ती देण्याबाबतचा निर्णय तज्ज्ञांच्या विचारविनिमयाने करून त्याबाबतची निरिक्षणे नोंदविणे आवश्यक असणारी आहे. याशिवाय त्याचा वापर केव्हा करू नये यासंबधी नियमावलातील निर्देशांचे पालन करावे असेही सांगण्यात आले आहे. यासंबधी सर्व सार्वजनिक व खाजगी रुग्णालयांना सूचित करावे आणि नियमपालनावर देखरेख ठेवण्याच्या सूचनाही केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

Continue reading

गणेशोत्सव जपानमधला…

यंदाचे म्हणजे २०२४ हे वर्ष जपानमधील योकोहामा मंडळाचे ९वे वर्ष. जपानमधील योकोहामा मंडळ वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतात. यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. यावेळी मे महिन्यापासूनच गणेशागमनाचे वेध लागले होते. दरवर्षी योकोहामा गणेशोत्सव शनिवार-रविवार २ दिवस साजरा केला...

होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने सुरू असलेल्‍या द ग्रेट होंडा फेस्‍टच्‍या फेस्टिव्‍ह मोहिमेदरम्‍यान त्‍यांची लोकप्रिय मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही होंडा एलीव्‍हेटची नवीन अॅपेक्‍स एडिशन लाँच केली आहे. मर्यादित युनिट्ससह अॅपेक्‍स एडिशन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी)...

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात

अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे घेऊन आली आहे, जी भेट...
error: Content is protected !!
Skip to content