Homeडेली पल्सदेशात पहिल्यांदा टॅक्सीचालकांना...

देशात पहिल्यांदा टॅक्सीचालकांना मिळू लागले निवृत्तीवेतन

असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने गोवामाईल्स आणि एचडीएफसी पेन्शन फंड यांच्या भागिदारीत गोव्यातल्या चालक समुदायासाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली सुरू केली आहे. गोव्यातल्या गोवामाईल्स प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या 5000 टॅक्सीचालकांसाठी ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू झाली आहे. देशातला पहिलाच अभिनव उपक्रम आहे. गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबरला पणजीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या योजनेचा शुभारंभ झाला. योजनेच्या शुभारंभाचे प्रतीक म्हणून 50 चालकांना स्थायी सेवानिवृत्ती खातेक्रमांक वितरित करण्यात आले. गोवामाईल्स आपल्या सर्व चालकांच्या एनपीएस खात्यात योगदान देणार आहे.

या योजनेचा प्रारंभ करताना गोव्याचे वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण आणि गोवामाईल्सच्या प्रयत्नांचे कौतुक केले. गोव्याचे चालक केवळ सेवा पुरवत नाहीत, तर ते प्रत्येक पर्यटकासमोर गोव्याचे आदरातिथ्य, संस्कृती आणि मूल्ये सादर करत राज्याचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून काम करतात. गोवा हे भारतातले सर्वात लहान राज्य असले तरी, आम्ही नेहमीच इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे आणि हा उपक्रम आमच्या सर्वसमावेशक विकासाच्या वचनबद्धतेचा आणखी एक पुरावा आहे, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. रमण यांनी सुरक्षित निवृत्तीसाठी लवकर सुरुवात करणे आणि आर्थिक शिस्त पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक व्यवसायासाठी, एक पेन्शन, हे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी “एनपीएस जरुरी है” हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content