Homeएनसर्कलडिझेलची तस्करी करणाऱ्या...

डिझेलची तस्करी करणाऱ्या मच्छिमारी नौकेला पकडले!

डिझेल तस्करी करणाऱ्या ‘जय मल्हार’, या मच्छिमारी नौकेला आणि तिच्यावरच्या पाच जणांना भारतीय तटरक्षक दलाने महाराष्ट्र किनाऱ्याजवळ गुरूवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे 27 लाख रुपयांचे बेहिशोबी पाच टन डिझेल आणि काही प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेली नौका, पोलीस, सीमाशुल्क आणि मत्स्योद्योग विभागाकडून चौकशी करण्यासाठी मुंबई बंदरावर आणण्यात आली. नौकेवरील व्यक्तींनी आधीच 5,000 लिटर इंधन मच्छिमारांना भरसमुद्रातच विकल्याचे पुढील तपासात उघड झाले.

या यशस्वी मोहिमेमुळे समुद्रातील डिझेलची तस्करी रोखण्यात भारतीय तटरक्षक दलाला आणखी यश प्राप्त झाले आहे. गेल्या तीन दिवसात 55,000 लिटर बेहिशोबी डिझेल जप्त करण्यात आले आहे. देशाच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि किनारपट्टीच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी त्वरित आणि समन्वित कृतींच्या महत्त्वावर भर देत, सागरी क्षेत्रात बेकायदेशीर कृत्यांना पायबंद घालण्यासाठी सदैव प्रतिबद्ध असल्याचे भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.  

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content