Wednesday, January 15, 2025
Homeमुंबई स्पेशलरोहित पवार, राजेश...

रोहित पवार, राजेश टोपे यांच्यावरही गुन्हे दाखल करा!

दगडफेक करुन हिंसा भडकवण्याचे षडयंत्र रचणारे, कारखान्यात याचे नियोजन करणारे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन, या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. यावेळी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा दरेकर यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणाच्या दौर्‍यावर असताना, अमृत महोत्सवी की रौप्य महोत्सवी वर्ष हे माहिती नसणार्‍याला कानाखाली मारली असती या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर, मविआ सरकारने राणेंवर गुन्हे  दाखल करुन, तुरुंगात टाकले होते. मग आता उपमुख्यमंत्र्यांबाबतीत जरांगे अश्लाघ्य वक्तव्य करत असतील तर, या राज्यात सर्वांसाठी कायदा सारखा असला पाहिजे. त्यामुळे जरांगेंवरदेखील गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आम्हीही सोबतच राहिलेलो आहोत. पण लोकं जमली म्हणून डोक्यात हवा जाऊन अहंकार आला. आणि याला बघून घेईन, त्याला बघून घेईन, बामणी कावासारखी भाषा यांच्या तोंडी आली. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही. याची चौकशी करुन, कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी केली.

जरांगेंनी सांगिलं होते की, मी समाजाकडून एक रुपया घेणार नाही. कुणी वर्गणी गोळा करायची नाही. मग मोठमोठे मोर्चे निघाले, जेसीबीने पुप्षवर्षा करण्यात आली. या सभांसाठी लाखो रुपये झालेला खर्च, ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. ते आले कुठून? मराठा आंदोलक आणि जरांगे यांच्या सहकारी संगिता वानखेडे यांनी सांगितले की, या आंदोलनाचा संपूर्ण खर्च शरद पवार यांनी केला. त्यांचे बॅनर, पोस्टरचा खर्चसुध्दा पवारांचेच नेते करत होते. एवढेच नाही तर, जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. पण शरद पवारांचे जरांगेंना फोन येत होते आणि जरांगे पवारांचेच ऐकत होते, असे वानखेडे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांचे फोन जरांगेंना येत होते का?, जरांगे शरद पवारांच्या सांगण्यानुसार वागत होते का? याची चौकशी झाली पाहिजे. आणि या आंदोलनासाठी झालेल्या आर्थिक उलाढालीची चौकशीदेखील ईडीमार्फत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content