Homeडेली पल्समालाडमधली प्रसिद्ध एम.एम....

मालाडमधली प्रसिद्ध एम.एम. लस्सी झाली इतिहासजमा!

मुंबईच्या मालाड (पश्चिम)मधील उपनगरीय रेल्वे स्थानकाजवळ, आनंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी १९ दुकाने पी उत्तर विभागाने काल (२८ एप्रिल २०२३) निष्कासित केली. त्यात मालाडवासियांच्या जिभेवर असलेली एम. एम. मिठाईवालाची लस्सीही इतिहासजमा झाली. ही लस्सी देणारे दुकानही या प्रक्रियेत साफ झाले. त्यामुळे या रस्त्याचे रूंदीकरण होतानाच सर्वसामान्य नागरिकांनाही या परिसराचा सुलभ वापर करणे शक्य होणार आहे.

मालाड (पश्चिम)मध्ये उपनगरीय रेल्वे स्थानकाबाहेरील आनंद मार्गाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. याठिकाणी असलेल्या कृत्रिम दागिन्यांची बाजारपेठ आणि मासळी बाजारामुळे दररोज किमान १ लाख २० हजार नागरिकांची वर्दळ या परिसरात असते. उपनगरीय स्थानकाला लागून असलेल्या या परिसरातील बांधकामांमुळेदेखील रस्त्यावर नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता, पी उत्तर विभागाने याठिकाणी रस्ते रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.

या रस्ता रुंदीकरण रेषेमध्ये एकूण १९९ बांधकामे अडथळा ठरत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात काल झालेल्या निष्कासनाच्या कारवाईत मालाडमधील एमएम मिठाईवाला दुकानासह एकूण १९ दुकानांवर कारवाई झाली. या कारवाईमुळे सुमारे १५ ते २० फूट रस्ता रूंद करणे शक्य झाले आहे. या कारवाईमुळे रस्ता रुंद करुन, वाहतूक सुरळीत करण्यासह नागरिकांनाही रस्त्याचा सुलभपणे वापर करणे शक्य होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या पर्यवेक्षणाखाली या १९ दुकानांवर निष्कासनाची कारवाई झाली. त्यामध्ये महानगरपालिकेचे १५ अभियंते, ४ पोकलेन, २ जेसीबी आणि ४ डंपर तसेच ४० कामगारांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content