Saturday, December 28, 2024
Homeकल्चर +फडणवीस म्हणतात- आमच्याकडे...

फडणवीस म्हणतात- आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते..

नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण, ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरूवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान”चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपल्याला अनुभवायला मिळतो. शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा, त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडिलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. त्यामुळे ‘संगीत मानापमान’ ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय. विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहयला मिळणार आहे. चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच “भामिनी”चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय. वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पाहयला मिळते. तसच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनीदेखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिचीदेखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहयला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.

हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजाची अनुभूती, संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहयला मिळतेय. ‘संगीत मानापमान’साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोझ केली आहेत. या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायली आहेत. यातले सात गायक राष्ट्रीय पुरस्कारविजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.

संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दाखवला. लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले की, “सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहयला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.

मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहयला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान”चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. “संगीत मानापमान!” एक भव्यदिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

रायशाचे सोनेरी यश

नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात रायशा सावंतने मुलींच्या गटात शानदार कामगिरी करताना लांब उडीत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. सध्या रायशा दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे. याअगोदर मे २०२३मध्ये झालेल्या...

महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात वाचन संकल्पाने!

वाचनसंस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्वाचे भरण-पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. यासाठी विद्यापीठे, महाविद्यालय व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम येत्या १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यात राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे उच्च...

आंतरशालेय जंप रोप स्पर्धेत आशनी, योगिता, झाकीर, स्वयंमला सुवर्ण

मुंबईच्या चेंबूर येथील दि ग्रीन एकर स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात आशनी काळे (लोरोटो कॉन्व्हेट), योगिता सामंत (के. जे. सोमय्या कॉलेज) आणि मुलांच्या याच गटात झाकीर अन्सारी, स्वयंम कांबळे (दोघेही...
Skip to content