Homeटॉप स्टोरीदावोसमध्ये पहिल्याच दिवशी...

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी साडेचौदा लाख कोटींचे सामंजस्य करार

दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकांच्या सत्रांत पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने पहिल्याच दिवशी तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार केले. यामुळे राज्यात १५ लाख रोजगारसंधी निर्माण होणार आहेत. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. हरित ऊर्जा, अन्नप्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही-ऑटोमोबाईल, जहाजबांधणी, डीजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणाऱ असल्याने, तेथे उद्योगवाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोसमधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र आहे. या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र या गुंतवणुकीचे स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योगविश्वाला साद घालत आहे, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

सामंजस्य करारांच्या आदानप्रदान कार्यक्रमात फडणवीस म्हणाले की, उद्योग क्षेत्राचा, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरील हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीवर वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल. उद्योजक, गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील. मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. एमएमआर क्षेत्राच्या विकासासह, तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या रोगजारनिमिर्तीवर भर दिला जात आहे.

दरम्यान, आगामी दोन दिवसात दावोसमध्ये एआय़, क्वांटम कंम्प्युटींग, डीजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यांसह फिनटेक, लॉजिस्टिक्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच जहाजबांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी, चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

आता झालेले सामंजस्य करार पुढीलप्रमाणे…

महाराष्ट्र सरकार – काल्सबर्ग

क्षेत्र: अन्न प्रक्रिया आणि कृषी

गुंतवणूक: ५०० कोटी

रोजगार: ७५०

महाराष्ट्र सरकार – योकी ग्रीन एनर्जी प्रा. लि.

क्षेत्र: नविनिकरणीय ऊर्जा

गुंतवणूक: ४ हजार कोटी

रोजगार: ६ हजार

ठिकाण: पालघर/एमएमआर

महाराष्ट्र सरकार – बीएफएन फॉर्जिंग्स

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: ५६५ कोटी

रोजगार: ८४७

ठिकाण: पालघर/एमएमआर

एमएमआरडीए – सुमिटोमो रियालिटी

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार: ८० हजार

एमएमआरडीए – के. रहेजा

गुंतवणूक: सुमारे १० बिलियन डॉलर्स

रोजगार: एक लाख

एमएमआरडीए – अल्टा कॅपिटल/पंचशील

गुंतवणूक: सुमारे २५ बिलियन डॉलर्स

रोजगार: २ लाख ५० हजार.

एमएमआरडीए – एसबीजी समूह

क्षेत्र: लॉजिस्टिक्स

गुंतवणूक: सुमारे २० बिलियन डॉलर्स

रोजगार: ४ लाख ५० हजार.

एमएमआरडीए – आयआयएसएम ग्लोबल

गुंतवणूक: सुमारे ८ बिलियन डॉलर्स

रोजगार: ८० हजार

एमएमआरडीए – जायका

धोरण आणि स्ट्रॅटेजी पार्टनर

एमएमआरडीए – सेम्बकॉर्प डेवलपमेंट लि. सिंगापूर

एकीकृत इंडस्ट्रियल पार्कसाठी नॉलेज पार्टनर

एमएमआरडीए – टेक्निकल युनिव्हर्सिटी, मुनीच, जर्मनी

शाश्वत नागरी वाहतूकप्रणाली

महाराष्ट्र सरकार – सूरजागड इस्पात

क्षेत्र: स्टील

गुंतवणूक: २० हजार कोटी

रोजगार: ८ हजार.

ठिकाण: गडचिरोली

महाराष्ट्र सरकार – लोढा डेव्हलपर्स

क्षेत्र: आयटी, डेटा सेंटर्स

गुंतवणूक: १ लाख कोटी

रोजगार: १ लाख ५० हजार.

ज्यांनी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणि विस्तार करण्याची तयारी दर्शवली असे: कोकाकोला, आयकिया, स्कोडा ऑटो.

याशिवाय, कार्लसबर्गचे सीईओ जेकब अँडरसन यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूकीला पोषक वातावरणाचे कौतुक करताना राज्याच्या उद्योग धोरणाला दाद दिली. कंपनी लवकरच भांडवली बाजारात आयपीओ आणण्यासाठी प्रय़त्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कोका-कोला कंपनीचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट मायकेल गोल्टझमन यांच्यासमेवतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या दृष्टीने चर्चा केली.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content