Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर विविध महापालिकेत महापौराच्या निवडीकडे लक्ष देण्याचे सोडून, मित्र पक्षांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताच्या विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक बळकट करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने

पाहत आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल  1 ट्रिलियन डॉलरकडे नेण्याच्या दृष्टीने दावोसमधली ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रवाना होण्यापूर्वी सांगितले.

महाराष्ट्राने गेल्या वर्षी 16 लाख कोटींचे गुंतवणूक करार केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्यशासनाने ठेवले आहे. दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content