Homeडेली पल्समाजी लष्करी अधिकाऱ्यांचा...

माजी लष्करी अधिकाऱ्यांचा हीरक महोत्सवी सोहळा संपन्न!

पुण्यतील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग – CME ) येथे लष्कराच्या यंग ऑफिसर्स कोर्स-30 आणि ग्रॅज्युएशन कोर्स-18 चे माजी लष्करी अधिकारी या अभ्यासक्रमाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नुकतेच एकत्र आले होते. 29 जून 1963 रोजी या अभ्यासक्रमाअंतर्गत ते भारतीय लष्करात रुजू झाले होते.

या तुकडीचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी गुरुवारी त्यातील 40 जणांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगला भेट दिली. या अभ्यासक्रमाने 1965 आणि 1971 चे युद्धात भाग घेतला आहे.

या तुकडीचे मेजर सुरिंदर वत्स यांना त्यांच्या अतुलनीय धैर्यासाठी आणि लढाऊ वृत्तीसाठी मरणोत्तर वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते, हा 1971 च्या युद्धादरम्यानचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. अनेक माजी अधिकारी सपत्नीक उपस्थित होते तसेच “वीर नारी” देखील उपस्थित होत्या.

सीएमईच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या समोर माजी अधिकाऱ्यांचे छायाचित्र काढून या सोहळ्याला सुरुवात झाली, त्यानंतर या कोर्सचे सर्वात वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल एनपी औल, एव्हीएसएम (निवृत्त) यांचे स्वागतपर भाषण झाले, त्यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. कमांडंट, सीएमई यांनी देखील माजी विद्यार्थी संमेलनाला संबोधित केले आणि त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त केला तसेच हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी देशभरातून इथे एकत्र जमल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.

 त्यांनी लष्करी कारवाया, लष्करी खेळ आणि नागरी सेवा क्षेत्रातील असाधारण कामगिरी तसेच अभ्यासक्रमाच्या यशाचा उल्लेख केला. त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि काही अपरिहार्य कारणांमुळे जे येऊ शकले नाही त्यांनाही शुभेच्छा दिल्या. अभ्यासक्रमाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले.

संध्याकाळी, कॉम्बॅट लायब्ररी फॅकल्टी, सीएमई येथे खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाने माजी अधिकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content