Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या राधिका जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर त्यांना साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क– ०२२-२४३०४१५०.

राधिका जोशी, या जयपूर अत्रौली घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. त्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या वरिष्ठ शिष्या पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या आहेत. कोलकाता येथील संगीत संशोधन अकादमीमध्ये पद्मविभूषण गिरिजा देवी यांच्याकडून त्यांनी अर्धशास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला आहे. राधिका एक बहुमुखी गायिका आहेत आणि ऑल इंडिया रेडिओच्या शास्त्रीय तसेच हलक्या शास्त्रीय (ठुमरी, दादरा, काजरी, होरी, इत्यादी) संगीतात ग्रेड मिळवलेल्या काही गायिकांपैकी त्या एक आहेत.

Continue reading

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन...

भाग घ्या हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेत

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने 'डिस्कवर, परफॉर्म, राइज इन खयाल', या थीमखाली हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ ते ३० वर्षे वयोगटातील कलाकारांसाठी असून, येत्या २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृह,...

राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे दमानियांचे षडयंत्र!

कृषी साहित्यखरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषीखरेदीबाबत सुरुवातीला उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला. त्यांनी...
Skip to content