Homeकल्चर +२८ ते ३०...

२८ ते ३० एप्रिलमध्ये आनंद लुटा संगीत नाट्यमहोत्सवाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत संगीत नाट्यमहोत्सव आयोजित केला असून नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. दररोज संध्याकाळी ५.३० वाजता त्याचे आयोजन संस्थेच्या वा. वा. गोखले (वातानुकूलित) सभागृहात होणार आहे.

गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत शारदा हे संगीत नाटक शुक्रवार, दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी सादर होईल. पुणे येथील भरत नाट्य संशोधन मंदिर ही नाट्यसंस्था त्याचे सादरीकरण करेल. शनिवार, दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित आणि संगीत दिग्दर्शक भास्करबुवा बखले यांचे संगीत स्वयंवर हे संगीत नाटक पुणे येथील कलाद्वयी ही संस्था सादर करेल. रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी विद्याधर गोखले लिखित संगीत मदनाची मंजिरी हे नाटक पुणे येथील कलाद्वयी संस्थेचे कलाकार सादर करणार असून त्याचे संगीत दिग्दर्शन प्रभाकर भालेकर आणि संगीतभूषण पं. राम मराठे यांनी केले आहे.

अधिकाधिक रसिकांनी या नाट्यमहोत्सवातील संगीत नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२४३०४१५० संपर्क साधावा.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content