सिंगापूरच्या मोहना कारखानीस यांनी लिहिलेल्या ‘एका’ या कादंबरीचे तसेच ‘जाईचा मांडव’ आणि ‘पैंजण’ या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमधल्या एव्हरशाईन हॉलमध्ये नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ होते. व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मीना नाईक, प्रा. जाई म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय सैतवडेकर तसेच डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दामले यांनी केले. प्रकाश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, लता गुठे, संजीवनी समेळ, संगीता अरबुने, कौतुक मुळे, फरझाना इकबाल आणि संजय कारखानीस इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.