Homeमाय व्हॉईसशिक्षणात हवा वैश्विक...

शिक्षणात हवा वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव

आम्ही विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच विश्वशांतीचा संदेश जगभर पोहोचविला. शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्बकम आणि विश्वबंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे मत शांतीदूत डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. कराड यांना मानद डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांचे तत्त्वज्ञान, युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचा संदेश व विश्वशांतीचा संदेश यशस्वीरित्या जगभर पोहोचवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. कराड यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ आज मायदेशी दाखल झाले.

डीलिट स्वीकारल्यानंतर प्रा. डॉ. कराड म्हणाले की, शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्बकम आणि विश्वबंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर हे निसर्गतत्त्व आहे. आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे. परंतु आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही. जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळ १८ ते ३० एप्रिल या कालावधीत युके आणि अमेरिका येथे रवाना झाले होते. या शिष्टमंडळात एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, डॉ. महेश थोरवे व अधिष्ठाता प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.

अमेरिकेतील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. कराड यांना मानद डी.लिट. पदवी गुरूवारी २५ एप्रिल रोजी अमेरिकेतील, उटाह राज्यातील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी बीवाययूचे अध्यक्ष सी शेन रीस यांनी प्रा. डॉ. कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतुक केले. तसेच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले.  

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content