सुसंगत आगाऊ कर जमा न करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांना 15 मार्चपूर्वी कर जमा करण्यासाठी उद्द्युक्त करण्याकरीता प्राप्तीकर विभागाने ई-मोहिम हाती घेतली आहे.
आर्थिक वर्ष (F.Y.) 2023-24दरम्यान प्राप्तीकर विभागाला काही व्यक्ती/संस्था यांनी केलेल्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती प्राप्त झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भरलेल्या करांच्या विश्लेषणाच्या आधारावर, विभागाला अशा व्यक्ती/संस्थांची ओळख पटली आहे ज्यांनी आर्थिक वर्ष 2023-24 (कर निर्धारण वर्ष 2024-25)साठी भरणा केलेले कर संबंधित कालावधीत केलेल्या आर्थिक व्यवहारांशी सुसंगत नाहीत. त्यामुळे, करदात्याच्या सेवा उपक्रमाचा एक भाग म्हणून प्राप्तीकर विभागाने एक ई-मोहिम हाती घेतली आहे. यामागचा उद्देश अशा व्यक्ती/संस्थांना ई मेलद्वारे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती देता येणार आहे. कर निर्धारण वर्ष 2024-25साठी आगाऊ कर ई-मोहिम महत्त्वाचे व्यवहार म्हणून चिन्हांकित करून तसेच एसएमएस करून त्यांना त्यांच्या आगाऊ करदायित्वाची अचूक गणना करण्यास आणि 15 मार्च 2024 रोजी किंवा त्यापूर्वी देय आगाऊ कर जमा करण्यास उद्युक्त केले जाणार आहे.
प्राप्तीकर विभागाला करदात्यांच्या विशिष्ट आर्थिक व्यवहारांची माहिती विविध स्त्रोतांकडून प्राप्त होत असते. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि ऐच्छिक कर पूर्ततेला प्रोत्साहन देण्यासाठी ही माहिती वार्षिक माहिती निवेदनाद्वारे (AIS) जाहीरव केली जाते आणि ती व्यक्ती/संस्था यांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येते. हे विश्लेषण करण्यासाठी AIS मधील ‘महत्त्वपूर्ण व्यवहार’ या स्वरुपात दर्शवण्यात येते.
महत्त्वपूर्ण व्यवहारांचे तपशील पाहण्यासाठी, व्यक्ती/संस्था त्यांच्या ई-फायलिंग खात्यावर लॉग इन करू शकतात (आधीच तयार असल्यास) आणि अनुपालन पोर्टलवर याची पूर्तता करू शकतात. या पोर्टलवर महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी ई-कॅम्पेन टॅबद्वारे प्रवेश करता येऊ शकतो. ज्या व्यक्ती/संस्था ई-फायलिंग संकेतस्थळावर नोंदणीकृत नाहीत त्यांना प्रथम ई-फायलिंग संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करावी लागते. नोंदणीकरिता ई-फायलिंग संकेतस्थळावरील ‘नोंदणी’ बटण दाबत त्यामध्ये संबंधित तपशील प्रदान केला जाऊ शकतो. यशस्वी नोंदणीनंतर, ई-फायलिंग खात्यात लॉग इन केले जाऊ शकते आणि ई-मोहीम टॅबच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण व्यवहार पाहण्यासाठी पूर्तता पोर्टलवर प्रवेश केला जाऊ शकतो.
करदात्यांना पूर्तता सुलभ करण्यासाठी आणि करदात्यांच्या सेवा वाढवण्याची त्यांची वचनबद्धता बळकट करण्यासाठी प्राप्तीकर विभागाचा हा आणखी एक उपक्रम आहे.