Homeचिट चॅटआजपासून करा ‘वर्क...

आजपासून करा ‘वर्क विथ नेचर’!

पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सध्या पुणे विभागातील रिसॉर्टवर ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ उपक्रम सुरू केला आहे.

27 ते 29 मार्च आणि 2 ते 4 एप्रिल दरम्यान आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि विविध क्षेत्रातील कर्मचारी पर्यटनासाठी इच्छूक आहेत. त्यांच्यासाठी एमटीडीसी रिसॉर्टवर वायफाय झोनची मोफत सुविधा देण्यात आली आहे. एखाद्या पर्यटकाने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही ही सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे चार-पाच दिवसांची सुटी घेत रिसॉर्टवर जाऊन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे पर्यटकांना शक्य आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर रिसॉर्टवरही ही सुविधा होणार आहे.

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आयटी आणि इतर कंपन्यांकडून नव्याने ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खाश्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे यासाठी एमटीडीसीमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले की, वर्क फ्रॉम नेचर सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथील एमटीडीसी रिसॉर्टवर सुरू केली आहे. पुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेज घाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा सुरू होईल.

तथापि, पर्यटकांनी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेत एमटीडीसी पर्यटक निवासात यावे. याठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोनाबाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसून येईल. निसर्गाचे भान ठेवून आणि कोरोनाबाबत दक्षता घेऊन पर्यटन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शूट, रिसेप्शन फोटोशूट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि रिसॉर्ट बुकिंगसाठी www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर संपर्क करावा.

कोरोना विरोधातील लढाईचा भाग म्हणून एमटीडीसी रिसॉर्टवरील पात्र कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासे आणि उपहारगृहे यांचे नव्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमीटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content