Sunday, June 23, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजनिदान मातृदिनी तरी...

निदान मातृदिनी तरी ‘आई’ला सोडा!

कालच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यामुळे आईसबंधातील जाहिरातींना सर्वच वर्तमानपत्रांत व माध्यमांमध्येंउधाण येणार हे समजू शकते. परंतु सामाजिक जाण जपणाऱ्या वर्तमानपत्राच्या मथळ्यांचाच वापर करून जाहिरात वाचकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. सामाजिक जाणीवच नव्हे तर राजकीय व सामाजिक नेत्यांना आवाज चढवून ‘देशाला हे समजले पाहिजे’, ‘देशाचा हा हक्क आहे..’, असे उठताबसता विचारणाऱ्यांनी तर जास्त ‘सजग’ राहण्याची गरज आहे.

मुख्य म्हणजे ज्या गोडेतेलाची ही जाहिरात आहे ते अतिमहागडे तेल मोठी शहरे आणि आजूबाजूच्या छोट्या शहरातच घेतले जाते. देशातील 75 ते 80 टक्के जनता ग्रामीण भागात राहत असून त्यांना हे तेल

घेणे परवडतच नाही.  इंग्रजीतील एक नामवंत लेखक म्हणतो त्याप्रमाणे “advertisement is legalized lying” तर नसेल ना इतकी शंका येऊ लागली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या कराव्या लागतात हे मान्य आहे. परंतु त्यालाही काही मर्यादा असाव्यात असे आता वाटू लागले आहे.

आणखी एक मोठा इंग्रजी लेखक म्हणतो की, “Good advertisement is one which sells the product without drawing attention to itself”. हे वाक्य मार्केटिंग व कॉपी लिहिणाऱ्यांना कुणी शिकवलेले नाही का? हल्ली अनेक जाहिराती पाहून असे विचारण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. आजच्या या विषयाच्याही दोन बाजू असतील. नाही असे नाही. परंतु वर्तमानपत्राचे नाव वापरून अशी जाहिरात करणे उचित नव्हे. निदान मातृदिनी तरी ‘आई’ला सोडा!

Continue reading

चला.. राजकीय प्रदूषणाचा भिकार खेळ संपला!

गेले पाच-सहा महिने सुरु असलेले राजकीय प्रदूषण अखेर कालच्या निवडणूक निकालाने संपले. राजकीय प्रदूषण अशासाठी म्हटले की, निवडणूक प्रचार व त्याआधी विविध राजकीय पक्षांच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी शब्दांची 'होळी' वा 'शिमगा' साजरा केला होता. केवळ शब्दच कानावर पडत होते...

राजकारण की समाजकारण म्हणजे अंडे पहिले की कोंबडी?

खरेतर हा सनातन प्रश्न आहे राजकारण की समाजकारण? महाराष्ट्रात हा प्रश्न घेऊन लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर समोरासमोर उभे ठाकले होते. यापासून तो अगदी आज, आतापर्यंत राजकारणानेच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. ''the darkest places in hell are...

टाकेहर्षची कहाणी.. करूण की संतापजनक?

महाराष्ट्रातील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठी असलेल्या त्रंबकेश्वर देवस्थानापासून अवघ्या 20/22 किलोमीटर्स वर असलेल्या टाकेहर्ष गावाची ही म्हटलं तर करूण म्हटलं तर संतापजनक कहाणी! अवघ्या 250 घरांची ही कहाणी. टाकेहर्ष, हे गाव आदिवासी पट्ट्यातील असून तेथे मूलभूत...
error: Content is protected !!