Homeपब्लिक फिगरसरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्तांना...

सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्तांना मदतीसाठी विलंब!

राज्य सरकारचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे नाशिकसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते दानवे यांनी आज नाशिक जिल्ह्यातील ता. वांजरवाडी व सिन्नर येथील मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. सरकारची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याने पूरग्रस्तांना मदत मिळण्यास उशिर होत असून याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पूर ओसरून आज आठवडा झाला तरी पूरग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने नागरिक, शेतकरी यांना अद्याप मदत मिळाली नाही. तहसीलदार ते जिल्हाधिकारी यांच्याकडे अद्याप पंचनामे आले नसल्याचे समोर आले आहे. नाशिक व सिन्नर शहरात मोठया प्रमाणात नागरिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणा प्रभावीपणे काम करताना दिसत नाही, असे ते म्हणाले.

सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या कुसुमबाई तानाजी घोरपडे व कविता गडक यांच्या घरांच्या नुकसानाची पाहणी दानवे यांनी केली. या पुरामुळे नागरिकांची घरे वाहून गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यांना तत्काळ निवारा व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

दुर्गम भागातील बंधाऱ्याची केली पाहणी

सोनंबे ता. सिन्नर येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुर्गम भागात असलेल्या गुरदरी बंधाऱ्याची पाहणी दानवे यांनी ट्रॅक्टरने काही अंतर जाऊन व नंतर पुढे पायी चालत केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत अधिकाऱ्यांना बंधाऱ्याचे कामही तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, सोनांबे गावचे सरपंच डॉ. रवींद्र पवार, स्थानिक गावकरी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content