Homeकल्चर +नीला भागवत, इला...

नीला भागवत, इला भाटे, वनिता खरात आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगकर्मींना वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकारांना हा पुरस्कार देण्यात  येतो. यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्याचे वितरण शुक्रवार, २६ जानेवारी २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या गोखले सभागृहात होईल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये नीला भागवत, इला भाटे, वनिता खरात, नीरज शिरवईकर, शशिकला कैकिणी आदींचा समावेश आहे.

यंदा संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार शशिकला कैकिणी यांना तर ज्येष्ठ कलाकार पुरस्कार नीला भागवत यांना देण्यात येईल. ज्येष्ठ रंगकर्मी हा पुरस्कार इला भाटे यांना आणि उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक हा पुरस्कार नीरज शिरवईकर यांना देण्यात येईल. उत्कृष्ट प्रवासवर्णन पुस्तकाचा पुरस्कार रवि वाळेकर यांना ‘इजिप्सी‘ या पुस्तकासाठी देण्यात येईल. उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री हा पुरस्कार वनिता खरात यांना तर संगीत-नाट्य रंगभूमीवरील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार डॅा. गौरी पंडित यांना देण्यात येईल.

संगीत विशारद या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षेत दादर-माटुंगा भागातून प्रथम क्रमांक मिळवणारे डॅा. प्रबोध चोबे आणि अदिती करंबेळकर यांना पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कार वितरणानंतर ‘नायजेरियावर बोलू काही’ हा नायजेरियाच्या वास्तव्यातील रंजक किस्से सांगणारा मेधा अलकरी यांचा दृक्श्राव्य कार्यक्रम होईल.

अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content