Homeटॉप स्टोरीमुंबईत कोरोनाबाधितांसाठी करा...

मुंबईत कोरोनाबाधितांसाठी करा ‘वॉररूम’शी संपर्क!

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक व तातडीने रुग्णशय्या उपलब्ध होण्यासह कोविड-१९संबंधी त्यांच्या विविध अडचणी निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेने विकेंद्रित पद्धतीने रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) जून २०२०पासून अंमलात आणली आहे. सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉररूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहेत. कोविडबाधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोविड-१९बाबत मदत हवी असेल तर वॉर्ड वॉररूमकडे संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बाधित रुग्णांना आवश्‍यकतेनुसार रुग्णालयांमध्ये रुग्णशय्या मिळवून देणे, ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी वॉर्ड वॉररूम महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. जून २०२०पासून विकेंद्रित पद्धतीने २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी ही कार्यप्रणाली नियमितपणे सुरू आहे. यातून कोविडबाधित रुग्णांना विभाग स्तरावरुनच अधिक जलद, सुलभ व प्रभावीपणे आरोग्यसेवा देण्यास मदत होत आहे.

या वॉर्ड वॉररूम अर्थात विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणेः

ए विभाग- २२७० ०००७, बी विभाग- २३७५ ९०२३, सी विभाग- २२१९ ७३३१, डी विभाग- २३८३५००४, ई विभाग- २३७९ ७९०१, एफ/दक्षिण विभाग- २४१७ ७५०७, एफ/उत्तर विभाग- २४०११३८०, जी/दक्षिण विभाग- २४२१ ९५१५, जी/उत्तर विभाग २४२१ ०४४१.

एच/पूर्व विभाग- २६६३ ५४००, एच/पश्चिम विभाग- २६४४ ०१२१, के/पूर्व विभाग- २६८४ ७०००, के/पश्चिम विभाग- २६२० ८३८८, पी/दक्षिण विभाग- २८७८ ०००८, पी/उत्तर विभाग- २८४४ ०००१, आर/दक्षिण विभाग- २८०५ ४७८८, आर/उत्तर विभाग- २८९४ ७३५०, आर/मध्य विभाग- २८९४ ७३६०.

एल विभाग- ७६७८०६१२७४ किंवा ७७१०८७०५१०, एम/पूर्व विभाग- २५५२ ६३०१, एम/पश्चिम विभाग- २५२८ ४०००, एन विभाग- २१०१ ०२०१, एस विभाग- २५९५ ४०००, टी विभाग- २५६९ ४०००.

प्रत्येक ‘वॉर्ड वॉररूम’मध्ये दिलेल्या दूरध्वनी क्रमांकांवर २४x७ तत्त्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत आहेत. वॉर्ड वॉररुममुळे कोरोनाबाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. अधिकाधिक कोविड रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा दिली जात आहे. गरजू कोरोनाबाधितांना तत्काळ योग्य रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुलभ व जलद गतीने होत आहे. विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही विभागीय कक्षाद्वारे होत आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोविडबाधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांनी योग्य त्या मदतीसाठी आपापल्या विभाग स्तरावरील वॉर्ड वॉररूमकडे संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content