Homeपब्लिक फिगर'कोकण पदवीधर'साठी नसीम...

‘कोकण पदवीधर’साठी नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली समिती

महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारंघातून महाविकास आघाडीचे (काँग्रेसचे) उमेदवार रमेश कीर यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने एक समन्वय समिती गठीत केली असून तिच्या प्रमुखपदी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या १५ जूनला मुंबईतले काँग्रेस मुख्यालय टिळकभवन येथे या समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या समितीत राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे नवी मुंबईचे समन्वय आहेत तर सहसमन्वयक निखील कविश्वर आहेत. सिंधुदूर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे समन्वयक सतेज पाटील तर सहसमन्वयक शशांक बावचकर आहेत. ठाणे शहर, ग्रामीण व कल्याण शहरसाठी विश्वजित कदम समन्वयक तर राजेंद्र शेलार सहसमन्वयक आहेत. भिवंडी उल्हासनगरसाठी हुसेन दलवाई हे समन्वयक तर प्रदीप राव सहसमन्वयक आहेत.

पालघर, वसई विरार, मीरा भाईंदरसाठी मुझफ्फर हुसेन समन्वयक तर सुरेश दळवी सहसमन्वयक आहेत. रायगड व पनवेल शहरसाठी अभय छाजेड समन्वयक तर संजय बालगुडे सहसमन्वयक आहेत शहापूरसाठी सुरेश टावरे समन्वयक तर सहसमन्वयक आकाश छाजेड आहेत. प्रदेश समन्वयकपदी सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश कंट्रोल रुम प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम तर प्रदेश कंट्रोल रुम सदस्यपदी गजानन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना बहुमताने विजयी करण्यासाठी ही समिती जिल्हा व ब्लॉक स्तरावर बैठका घेऊन निवडणुकीसाठी काम करेल. तसेच काँग्रेसबरोबरच मविआतील घटक पक्षांबरोबरही बैठक घेऊन कोकण विभागात विजयाची पताका फडकवण्यासाठी प्रयत्न करेल.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content