Homeचिट चॅटनवी मुंबईत 'स्वच्छ...

नवी मुंबईत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’!

सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) नेतृत्त्वाअंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ ही देशव्यापी मोहीम विशेष प्रकाशात येत आहे, जी नागरिकांना स्वच्छ आणि हरित पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत आहे.

नवी मुंबईकर या चळवळीला मनापासून स्वीकारत असून नवी मुंबईत शॉपिंग मॉल्समधून सुरू केलेल्या सेल्फी मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत. हा अनोखा उपक्रम ग्राहकांना मॉल्समध्ये जाण्यासाठी आकर्षित करत आहे.

दुसऱ्या स्वच्छ भारत मिशन-शहर अभियान (2.0) अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहिमेचा एक भाग असलेल्या स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी खरेदीदारांना स्वाक्षरी मोहीमेत (साइन अप) सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतर ते मॉलमधील सेल्फी पॉइंट्सवरून स्वच्छ दिवाळी सेल्फीद्वारे आपली पर्यावरणाबाबत जागरूकता आणि स्वच्छता यासह दिवाळी साजरी करण्याची आपली वचनबद्धता प्रदर्शित करु शकतात. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी साइन अप केलेल्या नागरिकांना खरेदीसाठी सवलतीच्या दरातील भेटकूपन ही दिली जात आहेत, ज्यामुळे निवड करणाऱ्यांमधे सकारात्मक मनोभावना निर्माण होत आहे. हा एक अनोखा उपक्रम असून त्यात नागरिकांचा समावेश असून स्वच्छतेच्या वचनबद्धतेसह उत्सवाचे प्रतिबिंब त्यातून दिसून येत आहे.

ही मोहीम केवळ नागरिकांना जनआंदोलनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत नाही तर स्वच्छ दिवाळीसाठी त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व म्हणूनही काम करत आहे. या प्रयत्नात नवी मुंबईकर एकत्र आल्याने, स्वच्छ दिवाळी ‘शुभ दिवाळी’ ही केवळ मोहीम बनली नाही तर ती हरीत, स्वच्छ आणि अधिक शाश्वत पध्दतीने सणासुदीचे दिवस साजरे करण्याच्या सामूहिक चळवळीत बदलले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content