Homeडेली पल्सराष्ट्रीय युवा संसद...

राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत छिंदवाडा केंद्रीय विद्यालय अव्वल!

33व्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल “नेहरू रनिंग शिल्ड (फिरती ढाल)” आणि चषक केंद्रीय विद्यालय क्रमांक 1, छिंदवाडा, मध्य प्रदेश (जबलपूर क्षेत्र, दक्षिण विभाग) यांना देण्यात येईल. याशिवाय, स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम आलेल्या चार विद्यालयांना विभागीय विजेते चषक देखील प्रदान केले जातील. तसेच, स्पर्धेत प्रादेशिक स्तरावर प्रथम आलेल्या 20 विद्यालयांना प्रादेशिक विजेते चषक प्रदान करण्यात येतील.

संसदीय कार्य मंत्रालयाने नवी दिल्ली येथील संसद भवन संकुल येथे केंद्रीय विद्यालयांसाठी 33व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2022-23च्या पारितोषिक वितरण समारंभाचे आज आयोजन केले आहे.

संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून त्यांच्या हस्ते पारितोषिके  प्रदान केली जातील. केंद्रीय विद्यालयांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2022-23 मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम आलेल्या केंद्रीय विद्यालय क्रमांक 1, छिंदवाडा, मध्य प्रदेशचे विद्यार्थी त्यांच्या “युवा संसद” बैठकीचे पुन्हा सादरीकरण करणार आहेत.

संसदीय कामकाज मंत्रालय अनेक वर्षांपासून केंद्रीय विद्यालयांसाठी युवा संसद स्पर्धा आयोजित करत आहे. केंद्रीय विद्यालयांसाठी युवा संसद स्पर्धेच्या योजनेअंतर्गत, केंद्रीय विद्यालय संघटनेच्या 25 क्षेत्रांमध्ये विस्तारलेल्या 150 केंद्रीय विद्यालयांमध्ये, 2022-23 मध्ये ही 33 वी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, विविध मतप्रवाहांबाबत  सहिष्णुता, विचारांची योग्य अभिव्यक्ती आणि लोकशाही जीवनपद्धतीची इतर मूल्ये विकसित करणे हा आहे. याशिवाय, ही योजना विद्यार्थ्यांना संसदीय प्रथा आणि कार्यपद्धती, चर्चा आणि वादविवादाचे तंत्र अवगत करून देते आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्वाची गुणवत्ता आणि प्रभावी वक्तृत्वकला आणि कौशल्य विकसित करते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content