Homeचिट चॅटदिव्यांगजनांना सक्षम बनवण्याचा...

दिव्यांगजनांना सक्षम बनवण्याचा 40 वर्षांचा प्रवास साजरा

मुंबईच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) AYJNISHD(D) अर्थात अली यावर जंग राष्ट्रीय मूकबधीर आणि कर्णबधीर संस्थेच्या 40 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे उद्घाटन आमदार आशिष शेलार यांनी नुकतेच केले. विविध रंगीबेरंगी सांस्कृतिक उपक्रमांसह भव्य उद्घाटन सोहोळ्यात भारताच्या विविध भागांतील दिव्यांगजन कर्मचारी आणि विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसह सर्व सहभागींना समावेश आणि संधी प्रदान करण्यात आली. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही संकल्पना असलेल्या 75 वर्षांच्या कामगिरीच्या अनुषंगाने चार दशकांच्या कामगिरीचे प्रदर्शन, विविध क्षेत्रातील उत्क्रांती आणि प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे वातावरण निर्मितीही झाली.

AYJNISHD(D), ही मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या (DPwD) प्रमुख सर्वोच्च राष्ट्रीय संस्थांपैकी एक आहे.

यावेळी बोलताना ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील तसेच देशातील मूकबधीर आणि कर्णबधीर व्यक्तींच्या समस्या दूर करण्यासाठी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सेवा, प्रयत्नांचे कौतुक केले. भारत सरकारच्या या संस्थेने गेल्या 40 वर्षांपासून समाजातील सदस्यांना दिलेल्या अविरत सेवेबद्दल त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी 10-20 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सर्व कर्मचार्‍यांना पुरस्कृत प्रदान केला आणि AYJNISHD(D) च्या विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, डॉ. हंस, ईसी सदस्य, कॉक्लियर प्रत्यारोपण सर्जन यांनी ‘कॉक्लियर इम्प्लांट: तंत्र आणि तंत्रज्ञानातील बदलत्या कलाचा अंगिकार’ या विषयावर चर्चा केली. या सत्राचे उद्दिष्ट श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी कॉक्लियर इम्प्लांटच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातील अलीकडील वैज्ञानिक कल प्रदान करणे हा आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content