जनआंदोलने आपल्या देशाला कधीच नवी नव्हती. आपला स्वातंत्र्याचा इतिहासच मुळी जनआंदोलनांची मालिका आहे. 19व्या शतकात 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतियांनी पहिले स्वातंत्र्यसमर लढवले. त्यापुढची 90 वर्षे इंग्रजी राजवट अधिकाधिक बळकट होत गेली. तसे छोटेमोठे सशस्त्र उठाव अनेक झाले. महात्मा गांधींकडे काँग्रेसचे नेतृत्त्व आले तेव्हा त्यांनी त्यातील जनतेचा सहभाग वाढवला. गांधींनी सविनय कायदेभंग, ही जी संकल्पना मांडली ती वाऱ्यासारखी पसरली आणि ब्रिटिशांचे तुरुंग भरून जाऊ लागले. “ब्रिटिशांचे कायदे मोडा आणि स्वातंत्र्य घ्या”, अशा प्रकारची ही कृती 1947पूर्वी निश्चितच समर्थनीय होती. भारतियांच्या हक्कांची ती प्रेरणा होती. नंतर मात्र कायदेभंग ही लोकशाहीपुढची मोठी अडचण...