ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते.
सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...
महायुतीच्या सरकारबद्दल झालेल्या सर्व्हेवर टीका करण्याआधी संजय राजाराम राऊत यांनी आपल्या मालकांना दर तीन महिन्यांनी बेस्ट सीएम म्हणून मिळालेल्या किताबासाठी केलेला सर्व्हे कोठे केला...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पक्षाला सुप्रिया सुळे यांच्या रूपाने महिला कार्याध्यक्षा प्राप्त झाल्या आहेत. त्याचे सर्वप्रथम अभिनंदन करूया. महाराष्ट्र राज्यात महिला धोरण प्रथम...
मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका...
ऐसे कैसे साधू झाले? भगवी वस्त्रे म्हणजे साधू का?? खरेतर पालघर आणि सिल्व्हासाच्या सीमा रेषेवरील गडचंचली गावात अलीकडेच घडलेल्या दोन साधू व चालकाच्या हत्त्येप्रकरणी...
आपण लहानाचे मोठे होत जाताना आपल्या आजूबाजूचा परिसर, माणसं, वातावरण, वास्तू यांच्याशी असं आणि इतकं एकरुप होतो की ते सगळेच आपल्या आयुष्याचा, व्यक्तिमत्वाचा भाग...
नवीन संसद भवन ही केवळ एक इमारत नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर असून ते भारताच्या निश्चयाचा संदेश...
एका दैनिकात म्हाडा व महारेरासंबंधी दोन बातम्या सविस्तर आल्याने जरा बरे वाटले. म्हाडाच्या बातमीने तर सिक्सरच मारलेली आहे. यात अनिल डिग्गीकरांनी कोटीच्या कोटी उड्डाणे...
राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याबद्दल काँग्रेसने तातडीने देशाची माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी...