मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

‘माझी मुंबई’वरील खुली...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कलाविषयक विविध उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात येत असते. याच उपक्रमांच्या शृंखलेत जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन...

रूपा पालेकर यांच्या...

कर्करोगाशी झुंज देतानाच शाळेत विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका रूपा पालेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आजपासून मुंबईच्या वर्सोवा येथील वर्सोवा वेल्फेअर हायस्कूल अँड...

नववर्षदिनी मुंबईतल्या राणीच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) रविवारी १ जानेवारी २०२३ रोजी दोन नवीन विक्रम नोंदविले गेले. एकाच...

मुंबईकरांना पालिकेची नववर्षाची...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ४ तरण तलावांसाठी आता सभासदत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना त्रैमासिक व मासिक सदस्यत्व देण्याचा निर्णय घेऊन महापालिका प्रशासनाने मुंबईकरांना नववर्षाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. बृहन्मुंबई...

रा. स्व. संघाचे...

मुंबईच्या चेंबूर येथील भारतीय जनता पक्षाचे माजी मंडळ अध्यक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा, माजी आमदार...

ऑटो रिक्षा, टॅक्सी...

मुंबईतल्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये 15 जानेवारी, 2023पर्यंत बदल (रिकॅलिब्रेट) करुन घ्यावा, असे आवाहन मुंबईचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. मुंबई...

नववर्षाच्या स्वागतासाठी श्री...

येत्या एक जानेवारीला नववर्ष साजरे करण्यासाठी भक्तांच्या सोयीसाठी मुंबईतल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मंदिराच्या श्री दर्शन तसेच इतर कार्यक्रमांची विशेष आखणी केली...

किशोरीताईंनी एसआरएमधले ढापलेले...

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळीत एसआरएतील लाभधारकांकडून हडपलेले दोन फ्लॅट त्यांच्याकडून काढून घेण्यात अखेर भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांना यश...

स्वा. सावरकर स्मारकाच्या...

मुंबईत झालेल्या विविध तिरंदाजी स्पर्धेतील चॅम्पियनशीप सामन्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (सावरकर धनुर्विद्या अकादमी) तिरंदाजांनी सर्व स्तरावर यश मिळवून आपले अधिक्य प्रस्थापित केले आहे. मुंबई...
Skip to content