स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.
भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...
मुंबईत यंदाचा माघी गणेशोत्सव उद्या, २५ जानेवारी २०२३ पासून साजरा होणार आहे. या माघी गणेशोत्सवादरम्यान असलेला अल्प कालावधी व त्यानंतर लगेचच साजरा होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या...
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतित करू इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे...
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे होणार्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्ये मुंबई महानगरपालिका भाग घेत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक...
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास...
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, काल, १७ जानेवारीला दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट, भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे,...
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची 26वी आणि...
राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) गिरण्यांच्या जमिनीवरील 11 मोडकळीस आलेल्या चाळींचा कालबद्ध पद्धतीने विकास केला जाईल आणि तेथील सुमारे 2062 रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल, अशी...
मुंबईतल्या हरित क्षेत्रात वाढ होण्यासाठी १० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावरील इमारतीचे बांधकाम करताना विकासकाला मियावाकी वन विकसित करणे बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने...
परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा, हा विषय शिकविण्यासाठी विशेष पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून त्याद्वारे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य...