महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...
जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील आमूलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआ) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. तसेचनवीन व नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृतीबद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने महावितरणला गौरविण्यात आले. यासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दलदेखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.
आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमात पॉवर अवार्ड २०२४चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद देव यांच्या हस्ते महावितरणचे मुख्य अभियंता (देयके व महसूल) संजय पाटील आणि वीज दर नियामक कक्षाचे अधीक्षक अभियंता मिलिंद दिग्रसकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या पुरस्कारांबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
वीज वितरण कंपनी म्हणून देशात नावलौकिक असलेल्या महावितरणने वीज क्षेत्रात पायाभूत आराखडा विकास, वीजबिलांच्या प्रक्रियेतील सुधारणा आणि जागतिक दर्जाची तत्पर ग्राहकसेवांना प्राधान्य देत आमूलाग्र सुधारणा सुरू केल्या आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना- २.०नुसार साकारले जात आहे. इतर राज्यांनीदेखील या क्रांतीकारी योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास सुरू केला आहे.
छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात महावितरणने देशात मोठी आघाडी घेतली आहे. अपारंपरिक ऊर्जा वापरामध्ये देण्यात येणारे प्राधान्य व लक्षणीय कामगिरी तसेच केंद्र शासनाच्या नवीन वनवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज -२ अंतर्गत १९ जानेवारी २०२४पर्यंत दोन वर्षांमध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते. महावितरणने हे उद्दिष्ट २५ सप्टेबर २०२३ रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले आहे.
महावितरणने वीज वितरण कंपनी म्हणून सुरू केलेल्या पायाभूत आराखडा विकासाच्या व ग्राहकसेवांच्या आमूलाग्र सुधारणा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात केलेली कामगिरी याची दखल घेऊन आयपीपीएआयच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर चार पुरस्कार प्रदान करून महावितरणला गौरविण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला जेमतेम महिना राहिला असतानाच रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चित्रसृष्टीशी संबंधित असलेल्या दिग्गजांच्या भेटीगाठी...
अवघे 200 रुपये हाती ठेऊन किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन सावकारांनी बळकाविलेल्या जमिनी सोडविण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019मध्ये एक समिती गठीत केली होती. या प्रयत्नांना...
पोलीस खात्यातील विशेषतः गुन्हा अन्व्हेषण भागातील पोलीस हवालदारांची गुन्हेगारांविषयीची माहिती शब्दबद्ध करणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी नुकतेच...
'लोकशाही' हा चित्रपट उद्या, ९ फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. घराणेशाहीतल्या या सत्तासंघर्षात नेमके काय आव्हान असणार आहे आणि या आव्हानाला जनतेचा काय...
पोषण अभियानात राज्य शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल फोन दिले जात आहेत. 2023-24मध्ये 110486 अंगणवाडी सेविका, 3899 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका, 589 तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी एकूण 1 लाख 14...
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, 31 जणांना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार - 2023 प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. यात 03 सर्वोत्तम जीवन...
गंगाघाटावर स्नान करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील आणि अनधिकृत व्हिडिओ, छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करणार्या हिरो सिटी व्लॉग, हरिद्वार...
भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी म्हणजे येत्या शुक्रवारी, २६ जानेवारीला सकाळी ९.१५ वाजता होणार आहे. याबाबतचे परिपत्रक...