Saturday, September 14, 2024
Homeडेली पल्स'लोकशाही'तला 'ओ भाऊ,...

‘लोकशाही’तला ‘ओ भाऊ, ओ दादा..’ उद्यापासून सिनेमागृहात!

‘लोकशाही’ हा चित्रपट उद्या, ९ फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. घराणेशाहीतल्या या सत्तासंघर्षात नेमके काय आव्हान असणार आहे आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहे, हे गुपित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत संजय अमर दिग्दर्शित ‘लोकशाही’ चित्रपटातील ‘ओ भाऊ ओ दादा..’, हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, सुप्रसिद्ध गायक जयदीप बगवाडकर यांनी आजवर मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी संगीत क्षेत्रातील नामांकित दिग्गज, गायिका श्रेया घोषाल, वैशाली सामंत, बेला शेंडे तसेच गायक अवधूत गुप्ते यांच्यासोबत अनेक रिअॅलिटी शोज केले आहेत.

जयदीप बगवाडकर यांचे सूर लाभलेल्या या गाण्याचे बोल संजय अमर यांचे असून या गाण्यामधून अभिनेता अंकित मोहनचा डॅशिंग लूक दिसत आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे, समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत लोकशाही सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. इतकंच नव्हे तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहयला मिळत आहे.

अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि. कंपनीचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, अल्ट्राच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक एव्हरग्रीन चित्रपटांची प्रस्तुती करत आलेलो आहोत. वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितीचा व प्रस्तुतीचा आमचा कल आहे. शिवाय या चित्रपटात राजकीय संघर्षावर आधारित ‘ओ भाऊ ओ दादा..’,  हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.

बहुचर्चित ‘लोकशाही’ उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात विलक्षण अनुभव घेता येणार आहे.

राजकारणातील महिलांचं अस्तित्त्व, घराणेशाही, सत्तासंघर्ष, निवडणुकांची रणधुमाळी, राजकीय कुरघोडी, पक्षांचा प्रचार आणि विजयाचा गुलाल चित्रपटात पाहयला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या भूमिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असून अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे सुप्रसिद्ध कलाकार राजकारणाच्या भयाण खेळात धुरळा उडवणार आहेत.

लोकशाही ही एका घराणेशाहीतल्या एका मुलीच्या वैयक्तिक पेचप्रसंगाची कथा आहे, जी तणावग्रस्त राजकीय नाटकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नैतिक अनैतिक कृत्यांवर आधारित आहे. समाजकारणात रस असलेल्या राजकारणी घराण्यात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची साखळी घडत जाते. जी साखळी नंतर तिच्या वडिलांच्या हत्येचं कारण बनते. सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताच्याच नात्यांनी तिच्या वडिलांचा जीव घेतला आहे. मात्र हत्या आणि हत्त्यामागचा कट कोणाचा आहे हे चित्रपटात कळणार आहे.

लोकशाही चित्रपट सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मित केला असून संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन संजय-राजी या जोडीने केले असून चित्रपटातील गाणी जयदीप बागवडकर आणि राजलक्ष्मी संजय यांनी गायले आहेत, तसेच संजय अमर आणि अल्ट्रा मराठीचे बिझनेस हेड शाम मळेकर यांनी गीतांना शब्द दिले आहेत.

पैसा आणि सत्ता माणसाला वेडं बनवून टाकते. सत्तेसाठी भुकेले असणाऱ्या अशा लोकांचा संघर्ष आणि त्याचे परिणाम लोकशाही चित्रपटात प्रेक्षकांना पाहयला मिळणार आहे. उत्तमोत्तम कथा प्रेक्षकांना सादर करताना एक निर्माता म्हणून अभिमानास्पद भावना आहे. असे अनेक आशयघन चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत राहणार आहोत, असे सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

योजनादूत व्हा आणि महिन्याला १० हजार कमवा!

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४पर्यंत यासाठी नोंदणीअर्ज करता येणार आहे. इच्छुकांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत...

नोटा उडवणाऱ्या शिवसैनिकांची होणार हकालपट्टी!

ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या तालावर नोटा उधळणाऱ्या कथित शिवसैनिकांची चौकशी चालू असून या लोकांना पक्षातून ताबडतोब काढून टाकले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. https://youtube.com/shorts/AEdfBCtuU4Y मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात आणि त्यांच्या दैवताच्या आनंदाश्रमात केवळ पैसेच उडवले...

वांद्र्याचा नाला खुलला बोगनवेलीने..

मुंबईतल्या पश्चिम महामार्गावर खेरवाडीजवळ असलेला जवळजवळ अर्धा किलोमीटरचा नाला अलीकडे नव्याने बंद करण्यात आला. या नाल्यावर मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने नुकतेच सुशोभिकरण केले. बहरलेल्या बोगनवेलीच्या झाडांनी तसेच टोपियारींनी हा नाला आता असा खुलून...
error: Content is protected !!
Skip to content