Thursday, October 10, 2024
Homeडेली पल्ससर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय  पुरस्कार ‘महावितरण’ला!

सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय  पुरस्कार ‘महावितरण’ला!

जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील  आमूलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआ) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. तसेचनवीन व नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृतीबद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने महावितरणला गौरविण्यात आले. यासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण  तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दलदेखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.

आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमात पॉवर अवार्ड २०२४चे विविध  पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय नवीन व  नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष डॉ.  प्रमोद देव यांच्या हस्ते महावितरणचे मुख्य अभियंता (देयके व महसूल) संजय पाटील आणि वीज दर नियामक कक्षाचे अधीक्षक अभियंता मिलिंद दिग्रसकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या पुरस्कारांबद्दल  महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अभियंते, अधिकारी व  कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

महावितरण

वीज वितरण कंपनी म्हणून देशात नावलौकिक असलेल्या महावितरणने वीज क्षेत्रात पायाभूत आराखडा विकास, वीजबिलांच्या प्रक्रियेतील सुधारणा आणि जागतिक दर्जाची तत्पर ग्राहकसेवांना प्राधान्य देत  आमूलाग्र सुधारणा सुरू केल्या आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना- २.०नुसार  साकारले जात आहे. इतर राज्यांनीदेखील या क्रांतीकारी योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास सुरू केला आहे.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात महावितरणने देशात मोठी आघाडी घेतली आहे.  अपारंपरिक ऊर्जा वापरामध्ये देण्यात येणारे प्राधान्य व लक्षणीय कामगिरी तसेच केंद्र शासनाच्या नवीन वनवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला १९ जानेवारी २०२२ रोजी रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज -२ अंतर्गत १९ जानेवारी २०२४पर्यंत दोन वर्षांमध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० मेगावॅटचे उद्दिष्ट दिले होते.  महावितरणने हे उद्दिष्ट २५ सप्टेबर २०२३ रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले आहे.

महावितरणने वीज वितरण कंपनी म्हणून सुरू केलेल्या पायाभूत आराखडा विकासाच्या व ग्राहकसेवांच्या आमूलाग्र सुधारणा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात केलेली कामगिरी याची दखल घेऊन  आयपीपीएआयच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर चार पुरस्कार प्रदान करून महावितरणला गौरविण्यात आले आहे.

Continue reading

माझी माऊली चषक कॅरम स्पर्धेत वेदांत राणे विजेता

 मुंबईतल्या सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ - जेजे व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माझी माऊली चषक आंतरशालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद युनिव्हर्सल स्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने पटकाविले. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात अचूक फटक्यांची आतषबाजी करीत वेदांत राणेने प्रारंभी ७-० अशी मोठी...

राज्यपालांच्या हस्ते अभिनेते प्रेम चोप्रा सन्मानित

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबईतील इस्कॉन सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते आमदार डॉ....

शेख, नंदिनी, तन्मय, वैभवी, मयुर, काजल ठरले सर्वोत्तम लिफ्टर

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई येथे आयोजित केलेल्या राज्य बेंचप्रेस स्पर्धेत क्लासिक गटात शेख समीर, नंदिनी उपर, तन्मय पाटील, वैभवी माने, मयुर शिंदे, काजल भाकरे यांनी आपापल्या गटात सर्वोत्तम लिफ्टरचा किताब संपादन केला. आमदार कालिदास  कोळंबकर यांच्या हस्ते...
Skip to content