चिट चॅट

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा महापौर डिंपल मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला. या सर्व पैलवानांनी विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून श्री गणेश आखाड्याचे, मीरा-भाईंदर शहराचे तसेच आपल्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा गौरव निश्चितच...

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर...

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू...

ठाण्याच्या श्री मावळी...

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३वी राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा मंगळवार, १४-०४-२०२६ ते शनिवार, १८-०४-२०२६ या...

आत्माराम मोरे स्मृती...

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली...

नवनिर्वाचित खासदार वडकुते...

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स...

श्री गणेश आखाड्यात...

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब...

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई...

एमजेएससी कॅरम स्पर्धेत...

मुंबईच्या माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता...

ऋषभ पंत आणि...

भारतातील सर्वात विश्वासार्ह खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने क्रिकेट सुपरस्टार ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांना आपले ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून...

दिव्यांग मुलांच्या ॲथलेटिक्स...

स्पेशल ऑलिंपिक भारत आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग नागपूर यांच्यातर्फे किड्स महाविद्यालय, रामटेक नागपूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत...
Skip to content