काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे तसेच कॅप्टन निलेश पेंढारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर शिबिराधीपती रविंद्र म्हसकर यांनी शिबिरार्थींना सेवादलाची कार्यप्रणाली यावर अतिशय सविस्तर प्रशिक्षण दिले. संध्याकाळी शिबिराथींच्या...
प्रो कबड्डीच्या समाप्तीनंतर प्रभादेवीत सुरू झालेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त विशेष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रिझर्व्ह बँकने मिडलाईन अॅकेडमी...
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईच्या चिंतामणी कलामंच, या संस्थेने २६ आणि २७ फेब्रुवारीला शालेय मुलांसाठी आयोजित केलेल्या हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेत तब्बल ४००हून अधिक...
साईनाथ स्पोर्ट्स आणि डॅशिंग स्पोर्ट्स या बलाढ्य संघांनी आपल्यापेक्षा तुलनेने कमजोर असणाऱ्या माटुंगा जिमखाना आणि युरोपेम यांच्यावर मोठे विजय मिळवून काल चौथ्या अजित घोष...
प्रो कबड्डीचा चढाई-पकडींचा खेळ थांबताच आता मुंबईतल्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने १४ अव्वल व्यावसायिक संघांची प्रो कबड्डीला...
महाराष्ट्र शासन महासंस्कृती महोत्सव 2024अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयोजित चेंबूरच्या बुद्ध महोत्सव संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशनतर्फे शंकर सोनावणे यांना कलाविष्कार चित्रकार म्हणून नुकतेच ...
मुंबई जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी 5 मार्च 2024पर्यंत अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व्हावी याकरिता मुंबई...
पूनम राऊत आणि श्वेता कलपाथी यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह दुसर्या विकेटसाठी केलेली ८२ धावांची भागिदारी आणि रेशमा नायकने २२ धावांत टिपलेल्या ३ विकेटस् या कामगिरीच्या...
मंजिरी गावडे आणि कृतिका कुमार यांनी ८८ धावांच्या दणदणीत सलामीच्या जोरावर उभारलेल्या ३ बाद १४० या आव्हानाचा पाठलाग करण्यात भारत क्रिकेट क्लब अपयशी ठरला. केतकी...
शर्वी सावेच्या ६० चेंडूंतील १०२ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनने (पीडीटीएसए) मुंबईच्या शिवाजी पार्कवरील प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२०...