Homeचिट चॅटसाडेपाच तासांत चार्ज...

साडेपाच तासांत चार्ज होणारी स्कूटर लवकरच बाजारात

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, या शाश्वत शहरी गतीशीलतेमधील आघाडीच्‍या कंपनीने नवीन इनोव्‍हेशन इब्‍लू फिओ एक्‍स इलेक्ट्रिक स्‍कूटरच्‍या आगामी लाँचची नुकतीच घोषणा केली. इको-फ्रेण्‍डली व कार्यक्षम परिवहन सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्धतेच्‍या माध्‍यमातून गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स इब्‍लू फिओ एक्‍ससह इलेक्ट्रिक स्‍कूटर बाजारपेठेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज होईल. फक्‍त ५ तास २५ मिनिटांमध्‍ये ही वेईकल संपूर्ण चार्ज होते.

इब्‍लू फिओ एक्‍स राइडर्सना अद्वितीय कार्यक्षमता, आरामदायीपणा व स्‍टाइल देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ती राइडर्सच्‍या विविध गरजा व पसंतींची पूर्तता करते. शक्तिशाली २.३६ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी असलेली इब्‍लू फिओ एक्‍स ११० एनएमचा सर्वोच्‍च टॉर्क निर्माण करते, ज्‍यामधून रोमांचक राइडिंग अनुभवासाठी प्रबळ शक्‍ती मिळते. इकॉनॉमी, नॉर्मल व पॉवर या तीन ड्रायव्हिंग मोड्ससह राइडर्स त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग स्‍टाइलनुसार राइडिंग अनुभवामध्‍ये अनुकूल बदल करू शकतात. चालक एका चार्जमध्‍ये ११० किमी अंतरापर्यंत प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. या स्‍कूटरमध्‍ये रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंगदेखील आहे, ज्‍यामुळे बॅटरीवरील ताण कमी होतो आणि ड्रायव्हिंग रेंज वाढते.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्‍हणाले की, आम्‍हाला आमच्‍या लाइनअपमधील नवीन वेईकल इब्‍लू फिओ एक्‍सचे अनावरण करण्‍याचा आनंद होत आहे. आमच्‍या

बहुमूल्‍य इब्‍लू फिओला ग्राहकांकडून मिळालेल्‍या बहुमूल्‍य अभिप्रायाचा काळजीपूर्वक विचार केल्‍यानंतर आम्‍हाला त्‍यांची इच्‍छा व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करणारे उत्‍पादन सादर करण्‍याचा अभिमान वाटत आहे.

इब्‍लू फिओ एक्‍समध्‍ये अद्वितीय राइडिंग अनुभव देणाऱ्या सुधारणा करण्‍यात आल्‍या आहेत. वाढवण्‍यात आलेले बूट स्‍पेस ते उच्‍चस्‍तरीय आरामदायीपणा, सुधारित सुरक्षितता वैशिष्‍ट्ये ते सुधारित स्थिरतेपर्यंत फिओ एक्‍समधील ‘एक्‍स’ एक्‍स्‍ट्राचे प्रतीक आहे. ही स्‍कूटर इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात संस्‍मरणीय अनुभव देते, तसेच उल्‍लेखनीय कार्यक्षमतेसह राइडर्सना उत्तम आरामदायीपणा व सोयीसुविधा देते.

आतील बाजूने राइडर्सना आरामदायीपणा व सोयीसुविधेसाठी डिझाइन केलेली अनेक वैशिष्‍ट्ये पाहायला मिळतील, जसे २८ लिटर अंडर-सीट स्‍टोरेज स्‍पेस, एर्गोनॉमिकली डिझाइन केलेली सीट, नेव्हिगेशनसाठी ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आणि गॅस सिलिंडर सहजपणे वाहून नेता येण्‍यासाठी व्‍यापक फ्लोअरबोर्ड एैसपैस जागा. इब्‍लू फिओ एक्‍समध्‍ये मोबाइल चार्जिंग पॉइण्‍टदेखील आहे, ज्‍यामुळे राइडर्स राइडिंगचा आनंद घेण्‍यासह त्‍यांचे डिवाईसेस चार्ज करू शकतात. ७.४-इंच डिजिटल फुल-कलर डिस्‍प्‍ले आवश्‍यक वेईकल माहिती देते. तिला सोईस्‍करपणे व कार्यक्षमपणे चार्ज करता येते. या वेईकलसोबत ६० व्‍होल्‍ट क्षमता असलेला होम चार्जर येतो आणि फक्‍त ५ तास २५ मिनिटांमध्‍ये वेईकल संपूर्ण चार्ज होते. तसेच, गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सला ३ वर्ष व ३०,००० किमीची सर्वसमावेशक वॉरंटी देण्‍यात येणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content