मुंबईमध्ये सध्या ‘बहावा’ बहरला आहे. अशी वंदता आहे की, बहावा फुलल्यानंतर ४० दिवसांत पावसाळा सुरू होतो. बहावाला गोल्डन शॉवर ट्री म्हणूनही ओळखले जाते. मध्यम आकाराची पिवळी-सोनेरी फुले देणारा बहावा, भारतासह मलेशिया आणि दक्षिणपूर्व आशियात आढळून येतो.
बहावाचे शास्त्रीय नाव कॅशिया फिस्तुला असे आहे. केरळचे राज्य फूल आहे. थायलंडनेही बहावाला राष्ट्रीय फूल म्हणून मान्यता दिली आहे. ३० ते ४० फूट उंच वाढणाऱ्या बहावाच्या झाडांना वसंत ऋतू तसेच उन्हाळ्यात फुले लागतात.
या झाडाला वैद्यकीय महत्त्वही आहे. मलावरोध तसेच लघवीच्या विकारावर या झाडाचा वापर केला जातो. हर्पिस सिम्प्लेक्स आजारावर बहावाची पाने वापरली जातात तर मधुमेहावरच्या उपचारांमध्ये बाहावाच्या खोडाचा वापर केला जातो, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.