अखेर भारताच्या पुरूष हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले. आता नुकत्याच संपलेल्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २ विरूद्ध १ असा पराभव केला.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये बारताने स्पेनवर २-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी परस्परांवर आक्रमणे केली. शेवटच्या मिनिटाला स्पेनच्या संघाने दोन पेनल्टी कॉन्रर मिळवत भारताशी बरोबरी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु गोलकीपर श्रीजेशने हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले आणि भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून दिले.
तब्बल ५२ वर्षांनंतर भारतीय पुरूष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवले आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्येही भारतीय पुरूष हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले होते. आधीच घोषित केल्याप्रमाणे भारतीय संघचा गोलकीपर श्रीजेश आजच्या सामन्यानंतर निवृत्त झाला. हा माझा शेवटचा सामना आहे आणि तो मी कमालीचा खेळणार, असे सांगणाऱ्या श्रीजेशने खरोखरीच कमालीची कामगिरी करत भारताविरूद्धचे स्पेनचे अखेरच्या क्षणापर्यंतचे आक्रमण यशस्वीरित्या परतवले.