Homeडेली पल्सब्राझीलचे लष्करप्रमुख जनरल...

ब्राझीलचे लष्करप्रमुख जनरल टॉमस पायवा भारत दौऱ्यावर

ब्राझिलियन लष्कराचे कमांडर जनरल टॉमस मिगुएल माइन रिबेरो पायवा हे 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2023 दरम्यान सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. भारत आणि ब्राझील या दोन देशांमधील लष्करात दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यात ही भेट एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

जनरल टॉमस यांनी आज 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी जनरल टॉमस यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या भारतीय सशस्त्र दलातल्या शहीद वीरांना आदरांजली वाहिली. त्यानंतर, जनरल टॉमस यांना नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्स येथे गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.

यावेळी टॉमस यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांच्या लष्कर प्रमुखांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली आणि विविध समकालीन विषयांवर सकारात्मक चर्चा केली. उभय देशांच्या सैन्यांमधील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या मुद्द्यांवरही त्यांनी यावेळी जनरल टॉमस यांनी नंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची भेट घेतली तसेच संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्याशीही संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेने दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्य आणि सहकार्य वाढवण्याच्या सामायिक उद्दिष्टांना अधोरेखित केले.

आपल्या या भेटीदरम्यान, जनरल टॉमस यांनी लष्कराच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांशीही सकारात्मक संवाद साधला ज्याच्या माध्यमातून ज्ञान आणि विचारांची व्यापकपणे देवाणघेवाण साध्य झाली. अशा प्रकारच्या भेटींमधून परस्पर देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याची प्रतिबद्धता तसेच लष्करांमधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी मदत मिळते.

ब्राझिलियन लष्कराचे जनरल टॉमस यांची ही भेट भारत आणि ब्राझीलच्या सैन्यांमधील खोलवर रुजलेल्या बंधांना अधोरेखित करते. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील केवळ लष्करी सहकार्य बळकट होण्याबरोबरच परस्पर सुरक्षा सहकार्य, जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी दोन्ही देशांची बांधिलकी आणखी दृढ व्हायला मदत मिळणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content