Thursday, December 12, 2024
Homeएनसर्कल8 कोटींच्या ब्रँडेड...

8 कोटींच्या ब्रँडेड सिगारेट जप्त!

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी एकाच वेळी झडतीसत्रं राबवले. या झडतीसत्रात त्यांनी साधारण आठ कोटींच्या ब्रँडेड सिगारेट जप्त केल्या.

गुप्तचरांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारावर, डीआरआयने समन्वयित कारवाई करत परदेशी नामचिन्हांकित (ब्रँडेड) सिगारेटच्या 53.64 लाख (53 लाख 64 हजार) कांड्या जप्त केल्या. या कांड्यांची एकूण किंमत 8.04 कोटी रुपये (8 कोटी 4 लाख रुपये) एवढी आहे. या कारवाईत या सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार त्याच्या साथीदारासह पकडला गेला आहे. सीमाशुल्क कायदा, 1962च्या तरतुदींनुसार त्यांना अटक झाली असून, सिगारेट तस्करीच्या व्यवहारातील आपला सहभाग, या दोघांनीही  कबूल केला आहे.

डीआरआयने भारतातील तस्करीच्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सिगारेट तस्करीचे हे जाळे उद्ध्वस्त करण्याची ही कारवाई म्हणजे, अशा बेकायदेशीर व्यापारात गुंतलेली जाळी नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या डीआरआयच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content