Homeएनसर्कलबँक ऑफ बडोदाच्या...

बँक ऑफ बडोदाच्या मराठी भाषेतल्या व्हाट्सएप बँकिंग सेवेचा शुभारंभ

भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आता आपल्या ग्राहकांना मराठी भाषेतही व्हॉट्सएप बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिक आणि वाचक ग्राहकांना आता व्हॉट्सएप बँकिंगच्या मराठी आवृत्तीद्वारे निवडक बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे.

मराठीच्या अगोदर ही सेवा हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतही उपलब्ध करण्यात आली आहे. बँकेचे विद्यमान किंवा इतर ग्राहक, त्यांच्या मोबाईल नंबरवरून “hi” टाइप करून आणि ८४३३८८८७७७ क्रमांकावर संदेश पाठवून या सेवेसाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर, ग्राहक ‘प्रोफाइल’मध्ये जाऊन ‘भाषा’ पर्याय निवडून उपलब्ध भाषा पर्यायांमधून त्यांच्या पसंतीची भाषा निवडू  शकतात. बँक लवकरच इतर भारतीय भाषांमध्ये व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करीत आहे. बँकेचे विद्यमान ग्राहक खात्यातील  शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट आणि चेक बुककरिता विनंती, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, कर्जाचे स्टेटमेंट इत्यादी इतर तत्काळ सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

बँक ऑफ बडोदाच्या डिजिटल लेंडिंग पोर्टलमध्ये हिंदी आणि इंग्रजीसह १३ भाषांमध्ये मोबाइल बँकिंग आणि व्यवहार संबंधित एसएमएस, ९ भाषांमध्ये एटीएम इंटरफेस, बीओबी वर्ल्ड इंटरनेट बँकिंगमध्ये हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे. बँकेच्या या धोरणाचा उद्देश सामान्य ग्राहकांना त्यांच्या सोयीस्कर भाषेत सेवा उपलब्ध करून त्यांच्याशी संबंध दृढ करणे आणि पारदर्शक बँकिंग तत्त्वाचे पालन करून अधिकाधिक लोकांना बँकिंगच्या कार्यक्षेत्रात आणणे असे आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content