Homeटॉप स्टोरीविधानभवनात तरी मूळ...

विधानभवनात तरी मूळ शिवसेना ठाकरेंचीच…

शिवसेनेच्या एकनाथ शिन्दे गटासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्यामुळे मूळ शिवसेना कोणाची, हा प्रश्न किमान विधानभवनापुरता तरी निकाली निघाला आहे. शिवसेनेत उभी फूट पाडून ५५ पैकी ४० आमदार फोडून एकनाथ शिन्दे यांनी राज्यात सत्ताबदल घडवून आणला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदही मिळवले. पण त्यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विशेष अधिवेशनाच्या वेळी शिन्दे गटाला मूळ शिवसेनेच्या कार्यालयावर कब्जा करण्यात अपयश आले होते. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या अधिवेशनाच्या काळात शिवसेनेच्या विधानभवनातील चौथ्या मजल्यावरील कार्यालयाला कुलूप लावण्यात आले.

एकनाथ शिन्दे यांचे सरकार महिन्याभरापेक्षा जास्त काळ मंत्र्यांच्या प्रतीक्षेत होते. मंत्रिमंडळ विस्तारामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिन्दे गटाला सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेचे चौथ्या मजल्यावरील कार्यालय कायम राहिल्यामुळे चौथ्या मजल्यावर शिवसेनेचे तर सातव्या मजल्यावर शिन्दे गटाचे म्हणजेच स्वयंघोषित शिवसेनेचे कार्यालय राहणार आहे.

मूळ शिवसेना कोणाची हा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चिला जात आहे. शिन्दे गटाने म्हणजे एकनाथ शिन्दे यांच्यापासून ते सर्वच चाळीस आमदारांनी आम्ही शिवसेना सोडलेली नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातही ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनीही तीच भूमिका शिन्दे गटाच्या वतीने मांडलेली आहे. पण, विधानसभेत शिन्दे गट मूळ शिवसेनेपासून वेगळा झालेला असून त्यांनी स्वंतत्र प्रतोदही नेमलाय आणि आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावाही केलेला आहे.

असे असूनही मूळ शिवसेनेचे विधान भवनातील कार्यालय कायम ठेवून शिन्दे गटासाठी सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे किमान विधानभवनात तरी मूळ शिवसेना म्हटले की चौथ्या मजल्यावरचे कार्यालय आणि शिन्दे गट म्हटले की सातव्या मजल्यावरचे कार्यालय यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content