यंदा शिक्षण मंत्रालय, युवाह (YuWaah) आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले नवोन्मेष चॅलेंज म्हणजेच शालेय नवोन्मेष चॅलेंज एटीएल मॅरेथॉन 2023-24 स्पर्धेसाठी नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
एटीएल मॅरेथॉन हे भारतभरातील तरुण नवोन्मेषकांसाठी राष्ट्रीय स्तरावरील नवोन्मेष चॅलेंज असून, जे त्यांच्या पसंतीनुसार सामुदायिक समस्यांवर उपाय शोधू शकतात आणि कार्यरत मूळ नमुन्याच्या स्वरूपात नाविन्यपूर्ण उपाय विकसित करू शकतात त्यांच्यासाठी हे चॅलेंज आहे.
गेल्या वेळची मॅरेथॉन देशभरातील शालेय विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आलेल्या 12000+ नवोन्मेषाची साक्षीदार ठरली. या वर्षीची एटीएल मॅरेथॉनची संकल्पना “भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिना” वर आधारित आहे. या अंतर्गत अंतराळ, कृषी, समावेशकता, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रातील अनेक समस्या विवारणासह विद्यार्थी सांघिक प्रकल्प तयार करू शकतात.
भारतातील आघाडीच्या कॉर्पोरेट्स आणि इनक्युबेशन केंद्रांसह विद्यार्थी नवोन्मेषक कार्यक्रमाद्वारे अव्वल संघाना इंटर्नशिपची संधी मिळेल, नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाकडून प्रमाणपत्रे आणि इतर अनेक उत्साहवर्धक संधी मिळणार आहेत. अमेझॉन वेब सर्व्हिस हे यंदाच्या एटीएल मॅरेथॉनचे आयोजन भागीदार आहे.
एटीएल मॅरेथॉन ही तरुण शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्साहवर्धक संधी आहे, असे या चॅलेंजचे अनावरण करताना अटल इनोव्हेशन मिशनचे अभियान संचालक डॉ चिंतन वैष्णव यांनी सांगितले. ”विद्यार्थी दिलेल्या कोणत्याही समस्यांवर किंवा त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्येवर नवोन्मेषी उपाय शोधू शकतात. एटीएल मॅरेथॉन ही देशभरातील सर्व शाळांसाठी खुली आहे, आम्हाला या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात सहभागाची अपेक्षा आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
एटीएल मॅरेथॉनच्या सहभागासाठी दुवा- https://atl.unisolve.org/