Homeचिट चॅटभारतात ‘अॅस्टर’ लॉन्च!...

भारतात ‘अॅस्टर’ लॉन्च! बुकिंग २१ ऑक्टोबरपासून!

एमजी मोटर इंडियाने भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही एमजी अॅस्टर ९.७८ रु. च्या खास प्रारंभिक किंमतीत लॉन्च केली आहे. ग्राहक आजपासून एमजीच्या विस्तृत नेटवर्क किंवा वेबसाइट (www.mgmotor.co.in) वर जाऊन अॅस्टरची टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतात आणि प्री-रिझर्व करू शकतात. बुकिंग २१ ऑक्टोबर २०२१पासून सुरू होईल आणि डिलिव्हरी नोव्हेंबर २०२१मध्ये सुरू होईल.

अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि डिझाइन एक्सलन्ससह अॅस्टर ही प्रीमियम मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेग्मेंटमधली गाडी आहे. ग्राहक स्टाइलपासून ते सुपर, स्मार्ट आणि सर्वोच्च स्थानी असलेल्या शार्पपर्यंतच्या व्हेरियन्टमधून आपल्या आवडीचे वाहन निवडू शकतात.

एमजी अॅस्टर एका स्टँडर्ड ३-३-३ पॅकेजमध्ये येते, ज्याच्यात तीन वर्षे/अमर्याद किलोमीटर्स, तीन वर्षं रोडसाइड असिस्टन्स आणि तीन लेबर फ्री पिरीयॉडिक सर्व्हिस सामील आहेत. अनोख्या माय एमजी शील्ड प्रोग्रामसह अॅस्टर ग्राहकांना वॉरंटी एक्स्टेंशन आणि प्रोटेक्ट प्लानसह आपले ओनरशिप पॅकेज निवडण्याची आणि पर्सनलाईझ करण्याची मुभा मिळते.

अॅस्टरचा ओनरशिप खर्च फक्त ४७ पैसे प्रती किलोमीटर आहे, ज्याची गणना एक लाख किमी.पर्यंत करण्यात येते. या सेग्मेंटमध्ये पहिल्यांदाच अॅस्टरमध्ये ३-६० प्रोग्राम आहे. हा एक अशुअर्ड बाय बॅक प्लान आहे, ज्याच्या अंतर्गत खरेदीनंतर तीन वर्षांनी ग्राहकांना अॅस्टरच्या एक्स-शोरूम किंमतीच्या ६० टक्के मिळू शकतात. हा प्रोग्राम लागू करण्यासाठी एमजी इंडियाने ‘कार देखो’शी भागीदारी केली आहे. अॅस्टर ग्राहक त्याचा स्वतंत्रपणे लाभ घेऊ शकतात.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले की, “अॅस्टर ही गाडी एमजी ब्रॅंडचा स्थापित वारसा पुढे नेत भविष्यातील मोबिलिटीस सम्मोहक बनवते आणि सोबत त्यात व्यक्तिमत्व, व्यावहारिकता आणि टेक्नॉलॉजी आणते. अनेक फीचर्सनी समृद्ध आणि या सेग्मेंटमध्ये आधी न दिसलेल्या टेक्नॉलॉजीने सुसज्ज ही एसयूव्ही या सेग्मेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करेल. या कारचे स्थान उत्तम आहे आणि किंमतदेखील आकर्षक आहे. माय एमजी शील्ड ग्राहकांना संपूर्ण मनःशांती प्रदान करते आणि प्रत्येकवेळी रोमांचक अनुभव देण्याच्या आमच्या तत्त्वज्ञानास ते अनुरूप आहे.”

एमजीच्या इमोशनल डायनॅमिझमच्या ग्लोबल डिझाइन फिलॉसॉफीअनुसार अॅस्टरचे स्टायलिंग करण्यात आले आहे. स्मार्ट आणि शार्प व्हेरियन्टसाठी अॅस्टरच्या आय-स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये ८०+ कनेक्टेड कार फीचर्स आहेत. ऑटोनॉमस लेव्हल २ फीचर्सवाल्या एडीएएस २२० टर्बो एटीमध्ये पर्यायी पॅकबरोबर शार्प व्हेरियन्टसाठी व्हीटीआय-टेक सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content