Homeचिट चॅटवसंतदादा पाटील महाविद्यालयात...

वसंतदादा पाटील महाविद्यालयात आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग

भारतातील काही निवडक महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशिअल इंजिनिअर्स, या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअर्स अँड व्हर्च्युअल आर्टच्या वतीने ही शाखा सुरू करण्यात आली आहे.

त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना रोबोटची निर्मिती, स्वयंचलित कार, ऑटोमोटोड फायनान्शिअल इन्व्हेस्टमेंट, व्हर्च्युअल ट्रॅव्हल बुकिंग सिस्टिम, प्रोएक्टिव्ह हेल्थकेअर मॅनेजमेंट, सोशल मीडिया मॉनिटेअरिंग, कॉन्व्हर्सेशनल मार्केटिंग या तंत्रज्ञानातील अत्यंत अद्ययावत यंत्रणेच्या अभ्यासासाठी होणार आहे.

वसंतदादा पाटील

या अभ्यासक्रमात डेटा सायन्स, बिझनेस इंटेलिजन्स, स्ट्रेटेजी, रिसर्च सायन्टिस्ट, डेटा मायनिंग इंजिनिअरिंग, मशीन लर्निंग यांचा समावेश असून यातून डिलॉईट, आयबीएम, एक्सेन्टर, अमेझॉन, लिंक्डिन, सायट्रिक्स, वेरिझॉन, सॅप लॅब्स, फ्लिपकार्ट, मायन्त्रा या ठिकाणी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

जगभरात २०५० सालापर्यंत अशा रोबोट मशीन्स येतील, ज्यांची बौद्धिक पातळी माणसाच्या बरोबरची असेल. ही बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी अलगोरिथम प्रोग्रामचा वापर करावा लागतो, जेणेकरून यंत्र माणसासारखा प्रतिसाद देईल. म्हणूनच त्या अनुषंगाने तंत्रज्ञानातील अभ्यासकाची निर्मिती आजपासूनच होणे गरजेचे आहे. काळाची ही पावले ओळखत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वसंतदादा पाटील शिक्षण संकुल, पूर्व द्रूतगती महामार्ग, शीव, मुंबई- ४०००२२ तसेच ९८१८५९५८६१, या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करता येईल, अशी माहिती संस्थेचे सरचिटणीस अॅड. अप्पासाहेब देसाई यांनी दिली आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content