Homeएनसर्कलमुंबईत पहिल्या डोससाठी...

मुंबईत पहिल्या डोससाठी अपॉइंटमेंट बंधनकारक!

मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवरची वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने यापुढे पहिला डोस घेणाऱ्या सर्व वयोगटातल्या लोकांना नोंदणीत मिळालेल्या वेळेनुसारच लस देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे आता लसीचा पहिला डोस घेणाऱ्या मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला कोविन ॲपवर नोंदणी करणे व तेथून वेळ घेणे (अपॉइंटमेंट) बंधनकारक राहणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र यानंतर अनेक ठिकाणी लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहे. या गर्दीमुळे शारीरिक अंतर राखण्यासह कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणारी काळजी घेतली जाणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ज्या नागरिकांची ‘कोविन ॲप’ वर नोंदणी झालेली आहे, तसेच ज्यांना संबंधित लसीकरण केंद्रावर मिळालेल्या ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ अनुसारच लसीकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण १६ जानेवारी २०२१पासून नियमितपणे राबविण्यात येत आहे. यासाठी साधारणपणे १४७ लसीकरण केंद्रे लशींच्या साठा उपलब्धतेनुसार कार्यरत आहेत. तथापि, गेले काही दिवस विविध लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे कोविड प्रतिबंधात्मक बाबींची अंमलबजावणी योग्यरीत्या होणे कठीण होऊ शकते. यामुळे आता केवळ ‘कोवीन ॲप’ किंवा ‘कोविन पोर्टल’ यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत.

या नियमातून दोन अपवाद करण्यात आले आहेत.

१. वय वर्षे ४५पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्या व्यक्तींना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे ‘हार्ड कॉपी’ किंवा ‘सॉफ्ट कॉपी’ स्वरूपात सादर केल्यानंतर लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी सदर बाबींची योग्य ती पडताळणी केल्यानंतर लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.

२. आरोग्य कर्मचारी (Health Care Worker) किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी (Frontline worker) यांच्याबाबत ज्यांना कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे अशा व्यक्ती, तसेच आरोग्य कर्मचारी (Health Care Worker) किंवा आघाडीवर काम करणारे कर्मचारी (Frontline worker) यांच्याबाबत लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा असल्यास अशा व्यक्तींच्या बाबत त्यांच्या नियोक्त्याने (Employer) अधिकृतपणे प्रमाणित केलेले निर्धारित नमुन्यातील पत्र याची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.

आजपासून महापालिकेच्या या नियमानुसारच काम होणार असल्यामुळे नोंदणी न केलेल्या नागरिकांनी लसीसाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content