Homeचिट चॅटराष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर...

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करा 30 नोव्हेंबरपर्यंत!

राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी (NMMSS) 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेली राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती, ‘नॅशनल मीन्स कम मेरिट’  शिष्यवृत्ती योजना एनएमएमएसएस ही आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची आठव्या इयत्तेनंतर होणारी गळती रोखण्याच्या आणि शिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातही त्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दिली जाते.

प्रत्येक वर्षी इयत्ता नववीमधील निवडक मुलांना एक लाख नवीन शिष्यवृत्ती बहाल केल्या जातात, तसेच राज्य सरकारी, सरकारी अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती सुरू राहते. या शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक 12,000 एवढी असते.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजेच ‘एनएसपी’ हा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठीचा एकात्मिक डिजिटल मंच आहे. त्यावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीची शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएसएस)बद्दल माहिती दिली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठीच्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे.

ज्या मुलांच्या पालकांचे सर्व स्रोताकडून मिळणारे उत्पन्न वार्षिक साडेतीन लाखांपेक्षा जास्त नसेल ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र आहेत. या शिष्यवृत्तीसाठी असलेल्या निवड परीक्षेला पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना सातवीच्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण किंवा तत्सम श्रेणी असणे आवश्यक आहे. (अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या  विद्यार्थ्यांसाठी गुणांमध्ये पाच टक्क्यांची सवलत आहे.)

यासाठी दोन टप्प्यात पडताळणी केली जाते. पहिल्या टप्प्यात संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याकडून (INO) तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्याकडून (DNO) अर्जाची पडताळणी होते. पहिल्या टप्प्यातल्या पडताळणीसाठी (INO-L1) शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 तर दुसऱ्या टप्प्याच्या पडताळणीसाठीची (DNO-L2) तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content