Homeकल्चर +'अमायरा'ला प्रेक्षकांचा उदंड...

‘अमायरा’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अमायरा’ हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २३ मे २०२५ला हा सिनेमा रिलीझ झाला. उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार कहाणी यामुळे या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड केली आहे. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत, सई गोडबोले यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खासकरून सर्वात यंग अभिनेत्री म्हणजेच सई गोडबोलेला प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देत आहेत.

काही सिनेप्रेमी प्रतिक्रिया देत म्हणाले की, ही फक्त कथा नसून, ती एक भावना आहे. सिनेमा पाहून मनापासून समाधान वाटलं. या चित्रपटाचे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे, असं एकाचं म्हणणं होतं. या चित्रपटात नव्या चेहऱ्याने साकारलेली मुख्य भूमिका तितकीच ताकदवान आहे. सईच्या नैसर्गिक अभिनयाने भारावून टाकले आहे. संगीतसुद्धा चित्रपटाचे वैशिष्ट्य असून प्रत्येक गाणं कथानकात सहज मिसळत जाते. विशेष म्हणजे, चित्रपटात एक अप्रतिक्षित वळण येतं जे आश्चर्यचकित करतं, असं मत एकाने व्यक्त केलं. संगीत, छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत यांनाही विशेष दाद मिळत आहे. सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटाचे अनेक भावस्पर्शी प्रसंग शेअर करत चित्रपटाविषयी आपले प्रेम व्यक्त केले आहे.

“अमायरा” हा चित्रपट प्रेम, संघर्ष आणि आत्मभानाच्या प्रवासाची कथा सांगतो. आजच्या तरुणाईला भावणारा असा हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटच्या अंतर्गत हा सिनेमा बनला आहे. या सिनेमाचे लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश पै निर्माते आहेत. निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल सहनिर्माते आहेत.

Continue reading

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात उभा राहतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...
Skip to content